crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

पिस्टलचा धाक दाखवून शिवकुमार ज्वेलर्समध्ये दरोडा टाकणारे दोन आरोपी जेरबंद; ६.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर

70 फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्समध्ये पिस्टलचा धाक दाखवून दोन सोन्याचे नेकलेस लुटणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना शहर गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत अटक करत 6 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
दि. 13 जून 2026 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात इसमांनी शिवकुमार ज्वेलर्समध्ये प्रवेश करून दुकान मालकाला देशी बनावटीच्या पिस्टलचा धाक दाखवत दोन सोन्याचे नेकलेस जबरदस्तीने लुटून नेले होते. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील व सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी चार स्वतंत्र तपास पथके तयार केली. या पथकांनी शहरातील विविध भागांतील तब्बल 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली तसेच तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला.

 

 

दरम्यान, चोरी केलेले दागिने विक्रीसाठी दोन संशयित अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी मंदिराजवळ थांबले असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जिलानी रफिक दामटे (वय 33) आणि साहिल उर्फ भाई नबी नंदियाल (वय 24) अशी आहेत. त्यांची झडती घेतली असता जिलानी याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, एक सोन्याचा नेकलेस व मोबाईल फोन तर साहिल याच्याकडून दुसरा सोन्याचा नेकलेस व मोबाईल फोन जप्त करण्यात आला.

 

 

 

पोलिसी चौकशीत आरोपींनी आणखी एक साथीदार रेहान उर्फ जड्डया रमजान लडाफ उर्फ शेख याच्या मदतीने गुन्ह्याची योजना आखल्याची कबुली दिली. त्यांनी आधी शिवकुमार ज्वेलर्सची रेकी केली होती. गुन्ह्यासाठी वापरलेली सुझुकी अॅक्सेस दुचाकी त्यांनी कुर्डुवाडी येथून चोरी केल्याचेही निष्पन्न झाले. दरोडा टाकताना दुकान मालकाने आरडाओरडा केल्याने नागरिक जमा होण्याच्या भीतीने आरोपींनी दुचाकी घटनास्थळीच सोडून पलायन केले होते.
या कारवाईत पोलिसांनी दोन सोन्याचे नेकलेस, चोरीस वापरलेली दुचाकी, देशी बनावटीचे पिस्टल, तीन जिवंत काडतुसे आणि दोन मोबाईल फोन असा एकूण 6 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 

 

 

ही उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, तुकाराम घाडगे, निलेश पाटील-सोनवणे तसेच त्यांच्या पथकातील कर्मचारी पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, अंकुश भोसले, जावेद जमादार, धिरज सातपुते, इम्रान जमादार, अनिल जाधव, विठ्ठल यलमार, विनोद रजपुत, सिध्दाराम देशमुख, विजयकुमार वाळके, तात्यासाहेब पाटील, अजिंक्य माने, संजय साळुंखे, उमेश पवार, अभिजित धायगुडे, आबाजी सावळे, काशिनाथ वाघे, भारत पाटील, वसिम शेख, राजकुमार वाघमारे, महेश रोकडे, सुभाष मुंढे, राजकुमार पवार, शैलेश बुगड, महेश शिंदे, महेश पाटील, विद्यासागर मोहिते, वाजीद पटेल, योगेश बर्डे, राहुल तोगे, अभिजित पवार व सायबर पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, नानासाहेब काळे, चालक सतिश काटे बाळासाहेब काळे, फरदिन शेख यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia