crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

एचपीसीएलकडून एसआरपीएफ पेट्रोल पंपाच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव

सोलापूर

 

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 10, सोलापूर येथील पेट्रोल पंपाने इंधन विक्री व ग्राहक सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या उत्कृष्ट कार्याची दखल घेत हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांनी संबंधित आऊटलेटचा विशेष गौरव केला आहे.
सदर पेट्रोल पंपावर दरमहा सरासरी 150 किलोलीटर (KL) इंधन विक्री होत असून, मे 2026 महिन्यात तब्बल 180 KL इंधन विक्रीची नोंद करण्यात आली. ही वाढ ग्राहकांचा वाढता विश्वास, उत्कृष्ट सेवा तसेच पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित मानले जात आहे.
एचपीसीएलने ‘प्रोजेक्ट अनुभव 2.0’ अंतर्गत या पेट्रोल पंपाची निवड केली असून, ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देणे, सेवा मानके उंचावणे तसेच आऊटलेटची सुविधा व आकर्षकता वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

 

 

या प्रकल्पांतर्गत पेट्रोल पंपावर विविध सुधारणा राबविण्यात येणार असून ग्राहक सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना अधिक दर्जेदार व समाधानकारक सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
या यशामागे राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 10, सोलापूरचे समादेशक डॉ. दीपाली काळे  यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या सूचनांमुळे व व्यवस्थापनामुळे पेट्रोल पंपाच्या कार्यक्षमतेत सातत्याने सुधारणा होत असून ग्राहकाभिमुख सेवा अधिक सक्षम झाली आहे.
तसेच पेट्रोल पंपाचे व्यवस्थापन पाहणारे  पोलीस निरीक्षक  दिलीप शिवाजी तडाखे व पोलीस कल्याण विभागातील कर्मचारी यांनीही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

 

 

 

 

त्यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धती, प्रामाणिक सेवा आणि ग्राहक समाधानावर दिलेल्या भरामुळे विक्रीत वाढ झाली असून सेवा गुणवत्तेतही लक्षणीय सुधारणा झाली आहे.
या गौरवामुळे एसआरपीएफ पेट्रोल पंपाने केवळ इंधन विक्रीतच नव्हे, तर ग्राहक सेवा व गुणवत्ता व्यवस्थापनामध्येही आदर्श निर्माण केला असून भविष्यातही अशीच उल्लेखनीय कामगिरी कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia