maharashtrapoliticalsocialsolapur

अधिक मासानिमित्त संतसंग व नामगजर कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न

सोलापूर

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अधिक मासानिमित्त जुने विठ्ठल मंदिर, जोशी गल्ली, सोलापूर येथे संतसंग व नामगजर कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
या पवित्र सोहळ्यास सोलापूर शहर व जिल्ह्यातील असंख्य भक्त-शिष्य, बालगोपाळ तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमादरम्यान संतसंगाच्या माध्यमातून अध्यात्मिक विचारांचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच “गणी गण गणात बोते” या मंत्राचा सामूहिक नामगजर करण्यात आला. नामस्मरणाच्या गजराने परिसर भक्तिमय झाला असून उपस्थितांनी आध्यात्मिक आनंदाचा अनुभव घेतला.
कार्यक्रमानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

 

 

 

यावेळी रामानंद संप्रदायाचे पश्चिम महाराष्ट्र पीठ महिला सपोर्टर सविताताई परांडे, जिल्हा महिला अध्यक्षा संजीवनीताई माने, जिल्हा तंत्रज्ञान प्रमुख सागर माने, जिल्हा देणगी प्रमुख सविताताई जाधव, जिल्हा धर्मक्षेत्र प्रमुख श्रीशाताई सगनाळे, संग्राम सेना ट्रेनर विजय गाडे, तालुकाध्यक्ष दिगंबर अवताडे, महिला तालुकाध्यक्षा ऐश्वर्याताई उत्तरकर, सचिव विद्याताई शेंडगे, युवा प्रमुख विनायक कांबळे, विशेष कार्यवाहक अमर दुधाळ तसेच माजी तालुकाध्यक्ष दादासाहेब नागटिळक यांनी उपस्थित राहून भाविकांना मार्गदर्शन केले.

 

 

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तुषार कांबळे, अर्जुन उत्तरकर, शुभम क्षीरसागर, निखिल मेटे, नरसिंग सगनाळे तसेच रामानंद संप्रदाय सेवा समितीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भक्त-शिष्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो ओळ : जुने विठ्ठल मंदिर, जोशी गल्ली येथे आयोजित संतसंग व नामगजर कार्यक्रमात उपस्थित भाविक व मान्यवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia