maharashtraindia- worldpoliticalsocialsolapur

अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन

नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती : १५ वर्षांपासूनच्या समस्या सुटणार

 

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : प्रतिनिधी

शहर मध्ये विधानसभा मतदारसंघातील अंत्रोळीकर नगर येथील ६१ लाख ५० हजार रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी सायंकाळी आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री गणेश मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला.

याप्रसंगी व्यासपीठावर आमदार देवेंद्र कोठे, नगरसेवक शिवाजी वाघमोडे, सात्विक बडवे, संगीता जाधव, शहर मध्य विधानसभेचे एस.आय. आर. प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, दिलीप पाटील, गुरुद्वाराचे प्रमुख रमेश सिंग, संत निरंकारी मिशनचे प्रमुख इंद्रपाल नागपाल, सतीश सुरवसे, रविकांत कोळेकर, राजाभाऊ माने, महेश बनसोडे आदी उपस्थित होते.

 

 

प्रारंभी अंत्रोळीकर नगरमध्ये ३८ लाख ३३ हजार रुपयांच्या विशेष निधीतून बांधण्यात येणाऱ्या श्री गणेश मंदिर येथील सभा मंडपाचे भूमिपूजन तसेच अंत्रोळीकर नगर परिसरात २३ लाख १७ हजार रुपयांच्या निधीतून टाकण्यात येणाऱ्या नव्या ड्रेनेज लाईनच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांपासून चुकीचे लोकप्रतिनिधी निवडून आल्यामुळे अंत्रोळीकर नगर आणि परिसराचा विकास रखडला होता. नियमितपणे महापालिकेचा कर भरूनही येथील मूलभूत समस्या सोडविण्यासाठीदेखील नागरिकांना तब्बल १५ वर्षे वाट पहावी लागली हे मोठे दुर्दैव आहे.

 

 

मात्र या पुढील काळात अंत्रोळीकर नगर परिसरासह शहर मध्यचा विकास थांबणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून शहर मध्य विधानसभा मतदारसंघाला गेल्या दोन वर्षात तब्बल १३५ कोटी रुपयांचा विकास निधी देण्यात आला आहे. यातील ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी आजवर प्रभाग २१ साठी देण्यात आला आहे. आगामी काळातही भाजपचे सर्व नगरसेवक आणि मी स्वतः नागरिकांच्या कायम संपर्कात राहून नागरिक सांगतील ती विकास कामे करण्यात येणार आहेत.

यावेळी अंत्रोळीकर नगरातील संजय टापरे, दिलीप पाटील, अशोक भोसले, विष्णू मोंढे, सचिन देशपांडे, गजानन डंके, दिलीप चव्हाण, अशोक भोसले, धनराज आनंदानी, मीनल दास, निशिकांत खेडकर, संतोष हलकुडे, राजू चव्हाण, शशिकांत कुलकर्णी, डॉ. शिंदे, प्रसन्न चाटुफळे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी सतीश सुरवसे यांच्या निवासस्थानी भेट दिली.

 

भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष नागेश सरगम यांनी सूत्रसंचालन तर माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button