india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठातील मंदिरास देणार एक कोटीचा निधी

आमदार देवेंद्र कोठे : धर्मसभा व सांगता समारंभ उत्साहात

 

 

 

सोलापूर : प्रतिनिधी

श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठ संस्था विष्णुपंत नगर अक्कलकोट रोड येथील मंदिरास नागणसूर मठाचे श्री श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांच्या आज्ञेवरून एक कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा आमदार देवेंद्र कोठे यांनी केली.

अधिक मासानिमित्त श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठ संस्था विष्णुपंत नगर अक्कलकोट रोड येथील मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.

 

 

यावेळी श्रीमद काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांची इष्टलिंग पूजा जगदगुरु उत्सव, धर्मसभा आणि सांगता समारंभ झाला. याप्रसंगी व्यासपीठावर रंभापुरी पिठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. विरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, काशी पिठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले,

श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठ संस्था येथील मंदिराच्या सभा मंडपासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याबरोबरच विष्णुपंत नगरात विविध रस्त्यांसाठी ४० लाख रुपयांचा निधी, मल्लिकार्जुन नगर येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित मुख्य रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात सुरू आहेत. परिसरातील रस्ते व इतर मूलभूत सुविधांसाठी यापूर्वी मोठ्या प्रमाणात विकासनिधी उपलब्ध करून देण्यात आला असून भविष्यातही या भागाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक नागणसूर मठाचे श्री श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी, माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, काशी पिठाचे डॉ. शैलेश पाटील, नगरसेवक अजय पोन्नम, मीनाक्षी कडगंची, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, गुरुशांत धुत्तरगांवकर, प्रकाश वाले, मल्लिनाथ मसरे, अप्पू कडगंची आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia