india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

संघशताब्दीनिमित्त डॉ. हेडगेवार पटांगण सुशोभीकरणासाठी एक कोटींचा निधी

आमदार देवेंद्र कोठे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तपपूर्तीनिमित्त भाजपातर्फे महाआरती

 

सोलापूर : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा चौफेर विकास होत आहे. या विकासप्रवाहात सोलापूरलाही आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त डॉ. हेडगेवार पटांगणाच्या सुशोभीकरणासाठी १ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा आमदार देवेंद्र कोठे यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तपपूर्तीनिमित्त पूर्व भागातील श्री यल्लमा मंदिरात भाजपा शहर मध्य विधानसभेतर्फे सोमवारी महाआरती करण्यात आली. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, मोनिका कोठे, महापौर विनायक कोंड्याल, भाजपाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

 

 

प्रारंभी श्री यल्लमा मंदिरात महाआरती करण्यात आली. याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीत गोरगरिबांची मोठी सेवा केली आहे. खेड्यापासून दिल्लीपर्यंत विकासाची गंगा त्यांनी प्रवाहित केली आहे. त्यांनी घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयामुळे देशाचा विकास वेगाने होत आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात देवस्थानांना सभामंडप आणि अन्य कारणांसाठी लागणाऱ्या भरघोस निधी देण्यात येत आहे. एकाही देवस्थानाला निधी कमी पडणार नाही. चुकीच्या विचारांचे आमदार मागील १५ वर्षांमध्ये शहर मध्य विधानसभा मतदारसंघात निवडून येत असल्यामुळे डॉ. हेडगेवार पटांगण दुर्लक्षित झाले होते. परंतु आगामी काळात या पटांगणाचे अत्यंत आकर्षक असे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच पूर्व भागातील मिरवणूक मार्गांवरील विद्युततारा अंडरग्राउंड करण्यासाठीची तयारी सुरू असल्याचेही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी सांगितले.

 

 

 

 

महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासदृष्टी राष्ट्राला पुढे नेत आहे. आगामी काळातही त्यांच्याकडून अशाच पद्धतीची देशसेवा होईल, असा विश्वास आहे.

भाजपाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक दशकांपासून देशाची सेवा केली आहे. त्यांच्या या कार्यातून देशभरातील कार्यकर्त्यांना सातत्याने प्रेरणा मिळते. त्यांची १२ वर्षांची पंतप्रधानपदाची कारकीर्दही उज्वल आहे, असेही शहर अध्यक्षा तडवळकर यांनी सांगितले.

 

 

 

यावेळी श्री यल्लमा मंदिराचे अध्यक्ष चंद्रकांत बोगा, उपाध्यक्ष रामलू जोरीगल, सचिव कमलेश बल्ला, सहसचिव भास्कर गोसकी, खजिनदार श्रीनिवास मिठ्ठा, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक बिज्जू प्रधाने, भारतसिंग बडूरवाले, सुनिता कामाठी, मंदाकिनी तोडकरी, जुगनबाई आंबेवाले, श्वेता खरात, मेघनाथ येमुल, अजय पोन्नम, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, विनोद भोसले, राजश्री दोडमणी, श्रीनिवास दायमा, ज्ञानेश्वर म्याकल, शिवाजी वाघमोडे, सत्यनारायण गुर्रम, अक्षय अंजिखाने, ऋषिकेश मेट्रे, शेखर इगे, सारिका खजूरगी, मनीष केत, रवी कैय्यावाले, युवराज सरवदे, शंकर चौगुले, अक्षय वाकसे, प्रशांत पल्ली, सिद्धेश्वर कमटम, विजय चिप्पा,माजी अध्यक्ष रामचंद्र जन्नू, शहर उपाध्यक्ष अंबादास बिंगी, लक्ष्मण गायकवाड, शहर सरचिटणीस प्रा. नारायण बनसोडे, सुधा अल्लीमोरे, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, नागेश खरात, नागनाथ सोमा, रवींद्र नक्का, चिटणीस बजरंग कुलकर्णी, चिटणीस रवी भवानी, क्रीडा प्रकोष्ठचे यशवंत पाथरूट, शिक्षक आघाडीचे दत्ता पाटील, जय साळुंखे, विजयकुमार रामपुरे, श्रीकांत वाडेकर, अनिल वंगारी, दास भंडारी, अप्पू कडगंची, समशेर आंबेवाले, प्रकाश गाजुल,विजय धोत्रे, किरण भंडारी, हरीश जंगम, राम गड्डम, , अशोक बिटला आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia