india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

लोणी क्रॉसजवळ बस–टिपरची समोरासमोर धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दहा जण जखमी

विजयपूर | प्रतिनिधी

दीपक शिंदे

 

विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील लोणी क्रॉसजवळ सरकारी बस आणि टिपर (कँटर) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे दहा जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चडचणकडे जात असलेल्या टिपरचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर टिपर समोरून विजयपूरकडे येणाऱ्या सरकारी बसवर जाऊन आदळला. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

 

 

या भीषण अपघातात टिपर चालक अशोक उटगी, त्यांची पत्नी राधाबाई उटगी तसेच सरकारी बस चालक हनुमंत चवलादी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात सुमारे दहा प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.
अपघातग्रस्त वाहनांमध्ये टिपर (केए-28-एए-6792) आणि सरकारी बस (केए-28-एफ-2468) यांचा समावेश आहे. अपघाताच्या वेळी टिपर चडचणच्या दिशेने जात होता, तर सरकारी बस चडचणहून विजयपूरकडे येत होती.

 

 

घटनेची माहिती मिळताच चडचणचे सीपीआय परशुराम मनगूळी, पीएसआय सोमेश गेज्जी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व पाहणी केली. हा अपघात चडचण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी तत्काळ मदतकार्य राबवून वाहतूक सुरळीत केली. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia