maharashtrapoliticalsocialsolapur

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आयपीएलचा दर्जा देणार उदय सामंत यांची घोषणा

लोकनाथ मीडिया चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन

 

सोलापूर

 

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला भविष्यात आयपीएलचा दर्जा देणार आहे. तसेच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूला शासकीय नोकरी देण्याचा प्रयत्न करणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोलापुरात केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापुरातील सेवालय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांच्या सहकार्याने पत्रकार बांधवांसाठी १२ ते १४ जून या तीन दिवसात रेल्वे मैदान, सोलापूर येथे आयोजित ‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ चे थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर खासदार डॉ. ज्योती वाघमारे, माजी आमदार राजेंद्र राऊत, आरोग्यदूत मंगेश चिवटे, नगरसेवक अमोल शिंदे , प्रियदर्शन साठे, अमर पाटील, महेश साठे, सेवालय फाउंडेशनचे प्रमुख मनीष काळजे, ज्ञानेश्वर सपाटे, राजू आलुरे , सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, डिजिटल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष विजयकुमार बाबर आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा पाहून आनंद होत असून. भविष्यात टेनिस क्रिकेट स्पर्धेला आयपीएल सारखा दर्जा देण्याचा आमचा मानस आहे.

 

 

 

जिल्हास्तरीय, विभागीय, राज्यस्तरीय व देशपातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला शासकीय नोकरीत सामावून घेण्याचा प्रयत्न भविष्यात आमचा असणार आहे. मीही क्रिकेट खेळाचा आवडता आहे. नुकतेच आम्ही राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा भरवली होती, मीही क्रिकेट स्पर्धेच्या वेगवेगळ्या संघटनांवर काम करत आहे. त्यामुळे मला क्रिकेट विषयी प्रेम आहे, असेही सामंत म्हणाले.
सूत्रसंचालन पल्लवी पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन विश्वभूषण लिमये यांनी केले. या स्पर्धेचे समालोचन शंकर पवार यांनी केले.
————–
बाळशास्त्री जांभेकर
राज्यस्तरीय स्पर्धा रत्नागिरीत

सोलापुरात आयोजित केलेली पत्रकारांसाठीची क्रिकेट स्पर्धा ही कौतुकास्पद आहे, याच धर्तीवर रत्नागिरी येथे बाळशास्त्री जांभेकर मीडिया क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यभरातील पत्रकारांचे क्रिकेट संघ सहभागी व्हावे असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

——————-
रेल्वे मैदानावर
उद्योगमंत्राची फटकेबाजी

लोकनाथ मीडिया क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आलेले उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोलापूरच्या रेल्वे मैदानावर राजकीय नेत्यांच्या गोलंदाजीवर अत्यंत सुरेख अशी फटकेबाजी केली. त्यांची फटकेबाजी पाहून उपस्थित खेळाडूंनी टाळ्यांची दाद दिली. प्रत्येकांच्या गोलंदाजीवर त्यांनी चौकार आणि षटकार खेचले.प्रारंभी सकाळच्या सत्रात मैदानाचे पूजन नगरसेवक मनीष केत, दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने, दिगंबर इप्पलपलली आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आप्पासाहेब पाटील तर आभार प्रदर्शन विक्रांत कालेकर यांनी मानले.
—–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia