crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूर ते तेलंगणा पाठलाग; कारचोरासह घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

फौजदार चावडी पोलिसांच्या डी. बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; ७ गुन्हे उघड, २४.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

सोलापूर

 

फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि वाहन क्रमांकांच्या आधारे तब्बल ५०० किलोमीटर पाठलाग करून तेलंगणामधून वाहनचोरी व घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले. या कारवाईत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये केलेले ७ गुन्हे उघडकीस आले असून सुमारे २४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

 

 

२० एप्रिल २०२६ रोजी आनंदनगर, गुरुनानक पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या स्विफ्ट डिझायर कारच्या तपासादरम्यान डी. बी. पथकाने आरोपीचा माग काढला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलेल्या संशयित वाहनाचा क्रमांक बदलण्यात आल्याचे निदर्शनास आले. पुढील तांत्रिक तपासातून वाहन तेलंगणामध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

 

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राजत यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तेलंगणातील निजामाबाद येथे जाऊन सय्यद मेहदी उर्फ मेहदी रेहमान (वय २४, रा. गोशानगर, निजामाबाद, तेलंगणा) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा साथीदार हजरत खान याचाही सहभाग निष्पन्न झाला.

 

 

 

आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये एमएच-१३ डीई ३०८४ ही स्विफ्ट डिझायर कार (किंमत ३.८५ लाख रुपये), एमएच-१२ आरके ६३११ स्विफ्ट कार (किंमत ७ लाख रुपये) तसेच चोरीनंतर विक्री करण्यात आलेल्या इतर दोन चारचाकी वाहनांचा समावेश आहे. याशिवाय गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली टीएस-०२ एफएल-३२५७ ही स्विफ्ट कारही जप्त करण्यात आली आहे.

तपासात फौजदार चावडी पोलीस ठाणे (सोलापूर शहर), जुळे सोलापूर पोलीस ठाणे, खडकी पोलीस ठाणे (पुणे) आणि शिरपूर पोलीस ठाणे (धुळे) येथे दाखल असलेले वाहनचोरी व घरफोडीचे एकूण ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींनी चोरीस गेलेल्या वाहनांचे क्रमांक बदलून त्यांचा वापर पुढील गुन्ह्यांसाठी केल्याचेही तपासात समोर आले आहे.

 

 

 

 

 

पोलिसांनी अवघ्या १५ दिवसांच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचून ही यशस्वी कारवाई केली. जप्त वाहनांसह एकूण मुद्देमालाची किंमत २४ लाख ८५ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलिस उपायुक्त डॉ.प्रितम यावलकर, , सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग १ प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर , पोलिस अंमलदार भाऊ कसबे, अमोल खरटमल, रवी धेंडे, कृष्णात बडूरे, विनोद पुजारी , विनोद व्हटकर, कुमार शेळके, शशिकांत दराडे, शिवानंद भिमदे, सूर्यकांत दराडे, आतिष पाटील ,विनायक जाधव , अजय चव्हाण, ज्ञानेश्वर गायकवाड ,पंकज घाडगे , आयाज बागलकोटे , सौरभ पाटील , मच्छिंद्र राठोड,नितीन मोरे, दत्तात्रय कोळवले यांनी यशस्वी पणे पार पाडली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia