crimemaharashtrapoliticalsocialsolapur

दिवस व रात्री घरफोडी करणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेकडून जेरबंद

दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस; सुमारे १ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर

शहरात दिवसाढवळ्या तसेच रात्री घरफोडी करून चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे. आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व लॅपटॉप असा एकूण सुमारे १ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत नगर, जुना विडी घरकुल परिसरात बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याची वाणी व अन्य ऐवज चोरी झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तसेच जुना विडी घरकुल परिसरातील आणखी एका घराचे कुलूप तोडून लॅपटॉप चोरी केल्याची घटना घडली होती. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

 

 

 

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार संशयित आरोपी दीपक भीमराव शिंगणे (वय २३, रा. प्लॉट क्र. १४३, रामनगर, शिंदे चाळीमागे, जुना विडी घरकुल, सोलापूर) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्याने दोन्ही घरफोड्यांची कबुली दिली.

 

 

पोलिसांनी आरोपीकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे :

१६ ग्रॅम वजनाची सोन्याची वाणी – किंमत ₹९६,०००
MSI Modern 14 Intel कंपनीचा लॅपटॉप – किंमत ₹२३,००० अशाप्रकारे एकूण ₹१,१९,००० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर तसेच पोलीस कर्मचारी अमोल जाधव, संदीप जावळे , विठ्ठल यलमार , उमेश पवार, महेश पाटील, सागर गायकवाड आणि महेश पाटील , सायबर पोलिस ठाण्याकडील मच्छिंद्र गायकवाड,प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली.

 

पोलिसांनी अटक आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia