india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त झेंडावंदन…

सोलापूर..

आजचा हा वर्धापन दिन अत्यंत वेगळा आणि भावनिक आहे, कारण आज आपल्या सर्वांमध्ये आपले आदरणीय दादा नाहीत त्यांच्या आठवणी सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनात दाटून येत होत्या प्रथमता आदरणीय स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी , आनंद मुस्तारे यांच्या हस्ते
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या ध्वजाचे झेंडावंदन माजी नगरसेवक सिद्धेश्वर आळंदकर यांच्या शुभहस्ते तसेच जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न करण्यात आले.

 

 

आदरणीय दादांनी पक्षासाठी जे कार्य केलं, जे योगदान दिलं आणि जी निष्ठा दाखवली, ते कधीही विसरता येणार नाही. शिव-शाहू-फुले-आंबेडकर या विचारधारेचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले, ते खरंच प्रेरणादायी आहेत.

त्यांचे विचार, त्यांचा मार्ग आणि त्यांचे कार्य पुढे नेण्याचा आम्हा सर्वांचा ठाम संकल्प सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त यांनी केला आहे.

 

 

याप्रसंगी , प्रा.श्रीनिवास कोंडी सर , अनिल उकरंडे ,ज्येष्ठ नेते भारत साबळे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले , माजी नगरसेविका नूतन गायकवाड , युवक अध्यक्ष सुहास कदम , महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम , प्रतिभा कांबळे , सुरेखा घाडगे , शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष मनोज शेरला, श्यामराव गांगर्डे विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत व्हसुरे, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी , दिव्यांग सेल विभाग अध्यक्ष एम एम इटकळे सोशल मिडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, सर्फराज बागवान, निलेश कांबळे , प्रज्ञासागर गायकवाड , शत्रुघ्न माने , ॲड .अमोल कोटीवाले, महेश व्हटकर,कामगार आघाडी विभाग अध्यक्ष मार्तंड शिंगारे, कार्याध्यक्ष संजय सांगळे , मौला शेख , शकील शेख सोशल मीडिया विभाग संघटक सचिन चलवादी, साजिद पटेल , आदित्य हुरळेकर, शहाबाज मुतवल्ली, जुवेद शेख , महमद पटेल उपस्थितीत होते.

 

या झेंडावंदन कार्यक्रमाचे संचलन प्रकाश जाधव यांनी केले ….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa