maharashtrapoliticalsocialsolapur

लोकनाथ’ मीडिया चषक स्पर्धेच्या किटचा लॉंचिंग समारंभ उत्साहात

लेखणीनंतर आता मैदानातही पत्रकारांची दमदार बॅटिंग होणार : क्रीडा अधिकारी शेख

 

सोलापूर

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापुरातील सेवालय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांच्या सहकार्याने पत्रकार बांधवांसाठी १२ ते १४ जून २०२६ या तीन दिवसात रेल्वे मैदान, सोलापूर येथे ‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा किट (टी शर्ट व पॅन्ट ) लॉंचिंग समारंभ उत्साहात पार पडला.

 

 

मंगळवारी सकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित ‘लोकनाथ’ मीडिया चषक स्पर्धेच्या किट (टी शर्ट व पॅन्ट ) चे लॉंचिंग समारंभास महापालिकेचे क्रीडा अधिकारी नजीर शेख, सेवालय फाउंडेशनचे प्रमुख मनीष काळजे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, डिजिटल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष विजयकुमार बाबर आदी मान्यवर उपस्थित होते. सोलापुरात होत असलेल्या ‘लोकनाथ’ मीडिया स्पर्धेत लोकमत, संचार, दिव्य मराठी, सकाळ, तरुण भारत संवाद, डिजिटल मीडिया, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघ, मेट्रो सोलापूर या संघांनी सहभाग नोंदविला आहे. सर्व संघास विविध रंगाचे किट देण्यात येत आहेत.

 

 

 

यावेळी महापालिकेचे क्रीडा अधिकारी नजीर शेख म्हणाले, पत्रकारांनी केवळ लेखणीतूनच नव्हे तर मैदानावरही आपली क्रीडाक्षमता दाखवतील.लेखणीनंतर आता मैदानातही पत्रकारांची दमदार बॅटिंग होणार आहे.
‘लोकनाथ चषक’मधून क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल.
पत्रकारांच्या दैनंदिन धावपळीच्या जीवनात शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची आहे. आयपीएलच्या धर्तीवर पत्रकारांमध्येही क्रीडा संस्कृती रुजावी. पत्रकार मैदानावरही तितक्याच जोमाने खेळतील, जितक्या जोमाने ते बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर सत्य मांडतात, असे ते म्हणाले.

 

 

 


राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. ‘लोकनाथ’ मीडिया चषक हा त्याचाच एक भाग असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली असल्याचे काळजे यांनी सांगितले. यावेळी सर्व संघांचे प्रशिक्षक, कर्णधार, खेळाडू व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

——-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa