दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत संभाजी आरमारचा बहारदार सामुदायिक विवाह सोहळा…

सोलापूर
छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि संभाजी आरमारच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणी केंद्र गवळी वस्ती येथे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. यंदाचे हे तिसरे वर्ष होतं.
या विवाह सोहळ्याला आशीर्वाद देण्यासाठी महसूल विभागात अनेक क्रांतिकारक निर्णय घेणारे राज्याचे महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे साहेब, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे डॅशिंग पालकमंत्री ना. जयकुमार गोरे साहेब, अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार सचिन (दादा) कल्याणशेट्टी, शहर मध्यचे लोकप्रिय आमदार देवेंद्र (दादा) कोठे, आमदार विक्रांत (दादा) पाटील यांची सन्माननीय उपस्थिती होती.

हजारो वऱ्हाडींच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांना मंत्री महोदयांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या दिमाखदार सोहळ्याचा शुभारंभ झाला. विविध जातीची आठ जोडपी यावेळी विवाह बंधनात बांधली गेली.
महसूलमंत्री ना. बावनकुळे यांनी या सामाजिक उपक्रमाचे आवर्जून कौतुक करत मागील 18 वर्षांपासून संघटना लोकहितासाठी करत असलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख केला. सोलापूरच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस सरकार कधीच कमी पडणार नसल्याचे सांगत आ. देवेंद्र दादा यांनी सांगितलेली गुंठेवारी तसेच B2 मिळकतीचा प्रश्न एका महिन्यात सोडवणार असल्याचा जाहीर शब्द दिला.

ना. जयकुमार गोरे यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करत छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालत संभाजी आरमार सामान्य माणसासाठी करत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
या सोहळ्यास माजी उपमहापौर नानासाहेब काळे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी नगरसेवक गुरुशांत (दादा) धुत्तरगावकर, महापालिका सभागृह नेते नरेंद्र काळे, जिल्हा परिषद अर्थ सभापती चेतनसिंह केदार, जिल्हा सरकारी वकील ऍड. प्रदीपसिंग रजपूत, उद्योजक मनीष (भैय्या) सुरवसे, शिवसेना जिल्हाप्रमुख शरणराज केंगनाळकर, प्रशांत बडवे, डॉ. अनिल हुलसुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजी (तात्या) वाघमोडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, शहरप्रमुख सागर ढगे, सरचिटणीस गजानन जमदाडे, उपजिल्हा प्रमुख सागर संगवे, संघटक राज जगताप, राजू रच्चा, पिंटू औरंगे, सुधाकर करणकोट, प्रवीण मोरे, प्रदीप मोरे, अविनाश विटकर, बाळासाहेब वाघमोडे, द्वारकेश बबलदीकर, दिनेश निंबाळकर, स्वप्नील इराबत्ती, किरण ताकतोडे, नागेश व्हनकडे, अक्षय अच्युगटला यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
या सोहळ्यात 3000 लोकांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

विशेष : पंडित वेणूगोपाल जिल्ला पंतलू यांच्या मार्गदर्शनाखाली 11 पुरोहितांच्या चमुने या मंगल सोहळ्याचे विधीवत पौरोहित्य केले.



