मंडलाधिकारी यांची लाच प्रकरणी जामीनावर मुक्तता:- ॲड. निलेश जोशी

यात हकीकत-
यातील तक्रारदाराच्या शेतजमिनीवर वारसदार म्हणून त्यांच्या आईचे नाव लावण्याकामी व बंद असलेला सातबारा पुन्हा चालू करण्यासाठी उपळे दुमाला ता. बार्शी येथील मंडल अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी यांनी तक्रारदाराकडे रक्कम रु. 3500/- लाचेची मागणी केलेली होती.
त्यामुळे तक्रारदाराने सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आरोपी हेमंत फुलारी यांच्याविरुद्ध रितसर तक्रार नोंदवलेली. त्यानुसार लाचेबाबतची सरकारी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता, आरोपी हेमंत फुलारी यांनी तक्रारदारांकडे रक्कम रु. 3500/- ची लाचेची मागणी करून तडजोडीअंती रक्कम रु. 3000/- स्वीकारण्याचे कबूल केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यानंतर पुढील लाचेसंदर्भातील सापळा रचण्यात आला.
ही रक्कम स्वीकारताना मंडल अधिकारी हेमंत फुलारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले होते. आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना बार्शी येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
त्यावेळी आरोपी हेमंत फुलारी यांच्यावतीने ॲड. निलेश जोशी यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सदर जामिनाच्यावेळी ॲड. निलेश जोशी यांच्यावतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. व्हि. के. मांडे सो। यांनी आरोपींची जामीनावर मुक्तता केली.
यात आरोपींच्यावतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. यशश्री जोशी, ॲड. अर्जुन देडे यांनी काम पाहिले.



