politicalsocialsolapur

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण अभिवादन…

सोलापूर

 

 

डाळींबी आड, शिंदे चौक येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने अत्यंत आदरपूर्वक अभिवादन करण्यात आले. यावेळी परिसरात भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याची उजळणी केली. शाहू महाराजांनी समाजातील दुर्बल, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न, तसेच शिक्षणामध्ये दिलेल्या आरक्षण धोरणाची भूमिका याचा विशेष उल्लेख करण्यात आला.

 

 

 

या प्रसंगी उपस्थितांनी आपल्या मनोगतातून शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घ्यावा, असे मत व्यक्त केले. समाजातील अन्याय, भेदभाव आणि विषमता दूर करण्यासाठी त्यांच्या विचारांची आजही तितकीच गरज असल्याचे वक्त्यांनी सांगितले.

 

 

 

कार्यक्रमास श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे, राजन भाऊ जाधव, बजरंग जाधव, अंबादास शेळके, प्रकाश ननवरे, अंबादास सपकाळ, सदाशिव पवार, कल्याण गव्हाणे, विजय पुकाळे, नागेश वडणे, सचिन स्वामी, देविदास बाबा बनसोडे, देविदास घुले, नामदेव पवार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्यरीत्या पार पडले असून शेवटी सर्व उपस्थितांनी शाहू महाराजांच्या कार्याला अभिवादन करत समाजहितासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia