crimemaharashtrapoliticalsocialsolapur

नरसापुर अत्याचारातील आरोपीला व्हावी कठोर शिक्षा

शहर भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

सोलापूर : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील नरसापुर येथे तीन वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीला कठोर आणि कडक शिक्षा करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहरातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.

याप्रसंगी भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

 

 

 

याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी (महसूल) कसेकर यांनी स्वीकारले. याबाबत भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या, तीन वर्षांच्या निरपराध बालिकेवर अत्याचार करून झालेली हत्येची घटना अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळीमा फासणारी आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. अशा अमानुष घटनांमुळे समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवून आरोपीस भारतीय दंड संहितेनुसार अधिकाधिक कडक शिक्षा व्हावी तसेच पीडित कुटुंबास तत्काळ आर्थिक मदत, संरक्षण व मानसोपचार सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केली.

 

 

 

 

 

यावेळी भाजपाचे सरचिटणीस डॉ. शिवराज सरतापे, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, महेश देवकर, शहर चिटणीस रवी भवानी, बजरंग कुलकर्णी, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष राजू हिबारे, अल्पसंख्यांक महामंत्री आदम शेख, व्यापारी आघाडी अध्यक्ष लक्ष्मीकांत खंडेलवाल, विश्वनाथ प्याटी, विजय धोत्रे, ओंकार होमकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia