maharashtrapoliticalsocialsolapur

चिमुरडीवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ संभाजी आरमार आक्रमक

नराधमाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा ‘चौरंगा’

नसरापूर

 

चार वर्षांच्या चिमुरडीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाच्या निषेधार्थ संभाजी आरमार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात आरोपीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा भरचौकात ‘चौरंगा’ (हात-पाय तोडणे) करून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. संभाजी आरमारच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली.

 

यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कठोर न्यायव्यवस्थेचा उल्लेख करत, स्वराज्यात महिलांवर वाईट नजर टाकणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षेचे स्मरण करून दिले. आजच्या काळातही अशाच कठोर शिक्षेची अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आंदोलनादरम्यान तयार करण्यात आलेल्या आरोपीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे हात-पाय तोडून ‘चौरंगा’ करण्यात आला. या कृतीतून समाजातील वाढता संताप आणि कायद्यावरील कमी होत चाललेला विश्वास अधोरेखित होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

 

संघटनेच्या प्रमुख मागण्या :

 

 

 

प्रकरणाचा तपास जलद गतीने पूर्ण करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा
आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी
या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये शशिकांत शिंदे (उपाध्यक्ष), गजानन जमदाडे (सरचिटणीस), सागर ढगे (शहर अध्यक्ष), सागर संगवे (जिल्हा उपाध्यक्ष),  संध्या हेब्बाळकर (महिला जिल्हाध्यक्ष), तसेच सौ. गव्हाणे,  गीता पवार,  अश्विनी गायकवाड,  कविता पाटसकर, शोभा घंटे, लक्ष्मीबाई कोळी, राज जगताप, तेजस चौधरी, रेवन कोळी, अर्जुन दादा शिवशिंगवाले, द्वारकेश बबलादीकर, अविनाश विटकर, स्वप्निल इराबत्ती, प्रवीण मोरे, सुधाकर, करणकोट, संजय तुळशीगार, बाळासाहेब वाघमारे, अमित जाधव, प्रदीप मोरे आदींचा समावेश होता.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित प्रकरणात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button