india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

ईच्छा भगवंताची परिवाराकडून आमदार सचिन (दादा)‎ कल्याणशेट्टी‎ यांचा सत्कार;‎ श्री स्वामी समर्थ‎ ग्रीन कॉरिडॉरमुळे‎ स्वामी भक्तांना सुलभ दर्शन, स्थानिकांना‎ रोजगाराच्या‎ नव्या संधी

ग्रीन‎ कॉरिडॉर‎ हा‎ केवळ विकास‎ प्रकल्प‎ नसून‎ स्वामी‎ भक्तांच्या‎ श्रद्धेचा‎ सन्मान आहे; धार्मिक पर्यटनाला चालना‎ मिळून‎ अक्कलकोटच्या अर्थव्यवस्थेला‎ नवी‎ गती मिळेल - आमदार‎ सचिन (दादा)‎ कल्याणशेट्टी

 

HTML img Tag Simply Easy Learning

 

 

सोलापूर‎ -‎

 

श्रीक्षेत्र अक्कलकोट‎ येथील‎ ब्रह्मांडनायक श्री‎ स्वामी‎ समर्थ महाराजांच्या पवित्र‎ भूमीचा सर्वांगीण‎ विकास‎ करून अक्कलकोटला जागतिक दर्जाचे‎ तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल‎ उचलण्यात‎ आले‎ आहे.‎ अक्कलकोट‎ विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार‎ आमदार सचिन‎ (दादा) कल्याणशेट्टी‎ यांनी‎ मुख्यमंत्री‎ देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने‎ पाठपुरावा करत मांडलेल्या‎ ‘श्री‎ स्वामी‎ समर्थ ग्रीन कॉरिडॉर’‎ संकल्पनेला‎ राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद‎ दिला‎ आहे. मुख्यमंत्री‎ देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाच्या‎ पहिल्या‎ टप्प्यासाठी सुमारे ५००‎ कोटींचा विकास‎ आराखडा‎ तातडीने तयार‎ करून शासनाकडे‎ सादर‎ करण्याचे आदेश दिल्याने‎ लाखो स्वामी भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले‎ आहे.‎ या ऐतिहासिक निर्णयाबद्दल‎ ईच्छा‎ भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक‎ तथा‎ सोलापूर‎ महानगरपालिकेचे प्रभाग‎ क्रमांक २२ चे‎ भाजपा‎ नगरसेवक‎ किसन‎ जाधव‎ यांच्या नेतृत्वाखाली ईच्छा भगवंताची‎ परिवाराच्या वतीने अक्कलकोट येथील संपर्क कार्यालयात‎ आमदार सचिन (दादा) कल्याणशेट्टी यांचा शाल,‎ श्रीफळ व‎ पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार‎ करण्यात‎ आला.

 

 

 

यावेळी‎ नगरसेवक‎ किसन जाधव म्हणाले,‎ श्री स्वामी‎ समर्थ ग्रीन कॉरिडॉर हा प्रत्येक स्वामी भक्ताच्या‎ श्रद्धेशी‎ जोडलेला‎ ऐतिहासिक‎ प्रकल्प‎ आहे. या‎ प्रकल्पामुळे‎ देशभरातून‎ येणाऱ्या‎ लाखो भाविकांना‎ सुरक्षित,‎ सुलभ आणि‎ आधुनिक दर्शन‎ व्यवस्था‎ उपलब्ध होईल. मंदिर परिसराचे सुशोभीकरण, पार्किंग,‎ स्वच्छता, पायी‎ चालणाऱ्या‎ भाविकांसाठी स्वतंत्र मार्ग‎ आणि अत्याधुनिक सुविधा‎ यामुळे अक्कलकोटच्या धार्मिक वैभवात‎ मोलाची‎ भर‎ पडणार‎ आहे.‎ आमदार सचिन दादा‎ कल्याणशेट्टी यांनी स्वामी‎ भक्तांच्या भावनांचा‎ आदर‎ राखत घेतलेला‎ हा‎ पुढाकार‎ कायम स्मरणात‎ राहील. सत्काराला उत्तर देताना आमदार सचिन (दादा)‎ कल्याणशेट्टी‎ म्हणाले, श्री‎ स्वामी समर्थ‎ ग्रीन‎ कॉरिडॉर‎ हा‎ केवळ बांधकामाचा प्रकल्प‎ नाही, तर‎ लाखो स्वामी‎ भक्तांच्या‎ श्रद्धेचा आणि‎ विश्वासाचा‎ सन्मान‎ आहे. या माध्यमातून‎ भाविकांना‎ अधिक सुलभ,‎ सुरक्षित आणि नियोजनबद्ध‎ दर्शन‎ व्यवस्था‎ उपलब्ध होईल. अक्कलकोटमध्ये‎ धार्मिक पर्यटनाला‎ मोठी‎ चालना‎ मिळेल.

 

 

 

 

त्यामुळे हॉटेल‎ व्यवसाय, व्यापारी,‎ वाहनचालक,‎ लघुउद्योजक‎ आणि स्थानिक नागरिकांसाठी‎ रोजगाराच्या नव्या संधी निर्माण‎ होतील.‎ श्रीक्षेत्र‎ अक्कलकोटचा सर्वांगीण‎ विकास‎ व्हावा या उद्देशाने आम्ही मुख्यमंत्री‎ देवेंद्र फडणवीस‎ यांच्याकडे हा प्रस्ताव मांडला आणि त्यांनी‎ कोणताही विलंब‎ न करता त्यास‎ मंजुरी‎ देऊन‎ प्रकल्पाला‎ गती दिली. यासाठी‎ मी त्यांचे‎ मनःपूर्वक‎ आभार‎ मानतो.‎ तसेच ईच्छा भगवंताची परिवाराने‎ माझा‎ केलेला‎ सन्मान हा माझ्यावरील प्रेमाचा‎ आणि‎ स्वामी भक्तांच्या‎ आशीर्वादाचा‎ स्वीकार असून, संपूर्ण‎ परिवाराचे‎ मी‎ मनःपूर्वक आभार व्यक्त‎ करतो.‎

 

 

यावेळी सामाजिक‎ कार्यकर्ते‎ शिवराज गायकवाड, चेतन‎ नागेश अण्णा गायकवाड, हुलगप्पा शासम,‎ महादेव राठोड, पाटील,‎ यल्लाप्पा‎ शिवपुरे‎ यांच्यासह ईच्छा भगवंताची‎ परिवाराचे पदाधिकारी व‎ स्वामी भक्त‎ मोठ्या‎ संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी हा प्रकल्प‎ अक्कलकोटच्या‎ धार्मिक,‎ सामाजिक‎ आणि‎ आर्थिक विकासाला‎ नवी दिशा देणारा ठरेल,‎ असा‎ विश्वास‎ व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button