india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

महिला हॉस्पिटल – विमानतळ – साखर कारखाना रस्ता दर्जेदार व सर्व सुविधायुक्त करण्यासाठी समन्वयाने काम करा : महापौर विनायक कोंड्याल

 

HTML img Tag Simply Easy Learning

 

सोलापूर

 

 

महिला हॉस्पिटल ते विमानतळ ते साखर कारखाना या शहरातील महत्त्वाच्या रस्त्याच्या विकासकामाबाबत आज महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत रस्त्याचे काम सुरु असून पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर ड्रेन, वीजवाहिन्या तसेच इतर भूमिगत सुविधांची कामे पूर्ण करून भविष्यात रस्ता पुन्हा खोदण्याची वेळ येऊ नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संबंधित विभागांच्या संयुक्त पाहणीनंतर एमएसआयडीसीकडे पाठविण्यात आलेल्या पत्रातील सूचनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महिला हॉस्पिटल ते साखर कारखाना या मार्गावरील विद्यमान ड्रेनेज लाईन, ५०० मिमी व्यासाची पिण्याच्या पाण्याची मुख्य जलवाहिनी, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज तसेच रस्त्याच्या कनेक्टिव्हिटीसंदर्भातील आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला.

 

 

महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी सांगितले की, हा रस्ता शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून भविष्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी एकत्रित नियोजन करून काम करावे. रस्ता तयार झाल्यानंतर पुन्हा खोदकामाची आवश्यकता निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित व दीर्घकाळ टिकणारा रस्ता करण्यात यावा.
बैठकीत उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते श्री. नरेंद्रजी काळे, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे , अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,एमएसआयडीसीचे कार्यकारी अभियंता उमेश झगडे, उपायुक्त गिरीश पंडित, नगरसेवक सात्विक बडवे, शिवाजी वाघमोडे, वैभव हत्तुरे, दीपक जमादार, जयकुमार माने, अझर हुंडेकरी, अझरुद्दीन जाहगीरदार, नगरसेविका संगीता जाधव, आनीसा मोगल, सफिया चौधरी तसेच एमएसआयडीसीचे अधिकारी प्रवीण जोशी, सय्यद पिरजादे, उपस्थित होते.

 

 

यावेळी सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे, उपअभियंता नीलकंठ मठपती, कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, सहाय्यक अभियंता महादेव इंगळे यांच्यासह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या तांत्रिक बाबी, आवश्यक सुधारणा आणि समन्वयाबाबत सादरीकरण केले.बैठकीत महिला हॉस्पिटल ते विमानतळ ते साखर कारखाना या मार्गावरील ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याची मुख्य जलवाहिनी, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी, चौकांचे नियोजन तसेच भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन आवश्यक सुधारणा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

 

 

सर्व संबंधित विभागांनी वेळबद्ध नियोजन करून कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी या प्रकल्पाचे काम उच्च दर्जाचे, नागरिकाभिमुख आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून पूर्ण करण्यात यावे, तसेच प्रत्येक टप्प्यावर संबंधित लोकप्रतिनिधी व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, असे निर्देश बैठकीत दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button