आज रूपा भवानी येथील वाल्मिकी समाज मंदिराची नगरसेवक प्रथमेश कोठेंकडून प्रत्यक्ष पाहणी

सोलापूर
स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांनी सोलापूरातील विविध समाजांच्या समाजमंदिरांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून तत्कालीन उपमुख्यमंत्री मा. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून अनेक समाजमंदिरांसाठी निधी उपलब्ध झाला आणि अनेक समाजांची स्वप्ने पूर्ण झाली.
मात्र, वाल्मिकी समाज मंदिराची काही कामे अपूर्ण राहिली होती. ही उर्वरित कामे पूर्ण करणे, हे माझ्यासाठी केवळ विकासकाम नाही तर स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या अपूर्ण राहिलेल्या संकल्पाची पूर्तता करण्याचे कर्तव्य आहे.

यासाठी महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सोलापूरचे मा. पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या विशेष निधीतून ही कामे पूर्ण करण्यासाठी मी पाठपुरावा करत आहे.

आज समाजातील प्रमुख मान्यवर, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी करून अपूर्ण कामांचा आढावा घेतला. ही कामे दर्जेदार आणि शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींवर चर्चा करण्यात आल्याचे नगरसेवक प्रथमेश कोठेंनी सांगितले.
वाल्मिकी समाजाच्या भावना आणि अपेक्षांचा मी मनापासून आदर करतो. समाजाच्या विकासासाठी आणि सर्वसमावेशक प्रगतीसाठी माझे प्रयत्न यापुढेही अविरत सुरू राहतील.



