maharashtrapoliticalsocialsolapur

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यासह एकूण 08 जण अटकेत. सोलापूर शहर, गुन्हे शाखेची कारवाई.

सोलापूर.

डॉ. ऋत्विक देविदास जयकर, वैद्यकीय अधिष्ठाता, छ.शि.म.स.रूग्णालय सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बझार पोलीस ठाणे येथे गु.र.नं- 554/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4), 336(3), 338, 340(2),233, 235, 3(5) हा गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याची थोडक्यात अशी की, इसम नामे राजेश भाऊसाहेब जाधव, रा. आहिल्यानगर याने कनिष्ठ लिपीक, पाटबंधारे विभाग अहिल्यानगर हि शासकीय नोकरी नियमित करणेकरीता सोलापूर येथील रहिवासी नसतानाही बनावट आधारकार्ड बनवून दिव्यांग प्रमाणपत्र मिळणेकामी श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे दि. 11/05/2026 रोजी UDID ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज सादर करून दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.

 

 

 

सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने सदरचा तपास मा. पोलीस आयुक्त, सोलापूर शहर एम. राज कुमार सो यांनी गुन्हे शाखा सोलापूर शहर यांचेकडे सोपविला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापुर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे दिलीप पवार, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे,  अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथक यांनी चालू केला.

सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने तपासी अधिकारी यांनी संपुर्ण तांत्रिक माहिती प्राप्त करून दिव्यांग प्रमाणपत्र निर्गमित झालेले आरोपी राजेश भाऊसाहेब जाधव याचा शोध घेवून त्यास गाव- करंदी ता. पारनेर, जि. अहिल्यानगर येथून ताब्यात घेवून या गुन्ह्यामध्ये अटक केली. अटकेदरम्यान त्याचेकडे केलेल्या तपासामध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढुन देण्याच्या कृत्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याच्या तपासकामी अटक केली आहे. आत्तापर्यंत एकूण 08 आरोपीतांना अटक केली असुन त्यांची माहिती खालील प्रमाणे .

(1) राजेश भाऊसाहेब जाधव, वय- 38 वर्षे, पत्ता- घ.नं-19, हुडको, नळेगाव व्हीटीसी नगर, अहमदनगर
व्यवसाय- नोकरी कनिष्ठ लिपीक, पाटबंधारे विभाग अहिल्यानगर.
(2) महेश दिनकर बारगजे, वय 52 वर्षे, धंदा.व्यवसाय, रा. घर नं.31 बी. अनंततीर्थ कॉलनी, बुरुडगाव
रोड, अहिल्यानगर.
(3) राजेश रमाकांत ढवण, वय-58 वर्षे, व्यवसाय :-सिव्हील हॉस्पीटल अहिल्यानगर येथुन लॅब असिस्टंट
या पदावरुन सेवानिवृत्त. रा. घर नं. 555 अ. सप्तश्रीगी निवास, ठाकुन गल्ली, तोफखाना,
अहिल्यानगर.
(4) विजय बाबासाहेब गर्जे, वय-48 वर्षे, व्यवसाय- प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद अहिल्यानगर
रा.प्लॉट नं.13 महात्मा फुले नगर पाथर्डी, जि.अहिल्यानगर
(5) अरुण रामदास शिंपी, वय-70 वर्षे, व्यवसाय- खाजगी नोकरी, सेवानिवृत्त. (बाटा कंपनीत सेल्समन)
रा.शिवधारा अपार्टमेंट फ्लॅट नं.4, उत्तम नगर, अंबड लिंग रोड, नियर बुरकुर्ले होल, सिडको, नाशिक.

(6) वसीम शौकत खान, वय-42 वर्षे, व्यवसाय- वरिष्ठ लिपीक नोकरी, नेम. सिव्हील हॉस्पीटल, सोलापूर.
रा. 222 गजानन नगर, आयडीयल उर्दु स्कूल जवळ, होटगी रोड मजरेवाडी, सोलापूर
(7) सागर गोविंद रजपूत, वय 42 वर्षे, व्यवसाय- वरिष्ठ लिपीक नोकरी,नेम. सिव्हील हॉस्पीटल, सोलापूर.
रा.17/33 वसंतराव नाईक नगर, नेहरु नगर, विजापूर रोड, सोलापूर,
(8) सतीश भाऊराव कनाके, वय-31 वर्षे, व्यवसाय निवासी वैद्यकीय अधिकारी, नेम. सध्या जिल्हा महिला व
बाल रुग्णालय सोलापूर. रा. मु. गणेशपुर, पो.कोठारी, ता.किनवट, जि.नांदेड,

गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपी क्र. 1 याचे बनावट आधारकार्ड कोठे तयार केले याबाबत तपास करून सदर संगणक व इतर साहित्य तपासकामी जप्त करण्यात आले आहे. तसेच बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनविण्यासाठी वापरलेले सिव्हील हॉस्पीटल सोलापूर येथील संगणक ही तपासकामी जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचे तपासकामी सिव्हील हॉस्पीटल, सोलापूर याचेकडून दि.01/01/2025 ते 31/06/2026 पर्यंत एकूण 3714 प्रमाणपत्र दिल्याचे व त्यापैकी 08 प्रमाणपत्रे हे तज्ञाची तपासणी न होता वितरीत झाल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले असून त्या दृष्टीने पुढील तपास चालू आहे.

सदरची कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापुर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त, (गुन्हे/वि.शा.), दिलीप पवार, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर,  भरत चंदनशिव व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार विनोद रजपुत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा भिंगारे, सुरज पवार, सफौ. अंकुश भोसले, जावेद जमादार, आबाजी सावळे, विठ्‌ठल यलमार, धिरज सातपुते, अमोल यादव, राजेश मोरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, महेश रोकडे, चालक बाळासाहेब काळे, सतिश काटे तसेच सायबर पो.स्टे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button