maharashtrapoliticalsocialsolapur

वर्षा_व_रंगांचा” कला प्रदर्शन सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद…

सोलापूर

 

येथील प्रतिभावान चित्रकार वर्षा मिथुन निरंजन (बाकळे) यांच्या निसर्गचित्रांचे “निसर्ग वर्षा” हे एकल कला प्रदर्शन डफरीन चौक येथील पु. ना. गाडगीळ दालनातील झपुर्झा आर्ट गॅलरीमध्ये मोठ्या उत्साहात भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूर शहर मध्य विधानसभेचे आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी आर्किटेक्ट शैलेंद्र सुराणा, ॲड. मनोज पामुल, माजी नगरसेवक दीपक राजगे, अभिषेक चिंता, पु. ना. गाडगीळ दालनाचे व्यवस्थापक जितेंद्र जोशी तसेच निरंजन परिवारातील सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार कोठे यांनी वर्षा निरंजन यांच्या चित्रांचे विशेष कौतुक करत, “कलाकाराच्या मनातील भावना चित्रांमधून जिवंत होतात,” असे मत व्यक्त केले.

 

 

सोलापूरच्या कलावंत असलेल्या वर्षा निरंजन यांचा कला प्रवास मागील पंधरा वर्षांपासून सुरू असून त्यांनी बेंगलुरू, मुंबई, पुणे यांसारख्या विविध शहरांमध्ये आपल्या चित्रांचे यशस्वी प्रदर्शन भरवले आहे. त्यांच्या कलेला Camlin Award, State Award (2012), Artscapes Oman (2015 – 4th Place) आणि Bombay Art Society Special Award (2018) असे अनेक मानाचे पुरस्कार लाभले आहेत.
त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या पारंपरिक ब्रशऐवजी Palette Knife Technique चा वापर करून चित्र साकारतात. तसेच Charcoal Painting ही त्यांची खास ओळख आहे. निसर्ग हा त्यांच्या कलेचा प्रमुख विषय असून अथांग समुद्र, उसळणाऱ्या लाटा, धबधबे, नद्या, तलाव, डोंगरदऱ्या यांचे अप्रतिम चित्रण त्यांच्या कॅनव्हासवर पाहायला मिळते. याशिवाय व्यक्तिचित्रे, मंदिरे आणि दैवतांची चित्रेही त्यांनी प्रभावीपणे साकारली आहेत.

 

 

 

 

त्या ऑर्डरनुसार चित्रनिर्मिती करत असून कला शिकण्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Online व Offline वर्गही घेतात.
हे प्रदर्शन ३ मे २०२६ पर्यंत सर्वांसाठी खुले असून २ मे रोजी सायंकाळी ५ वाजता चित्रकलेचे विशेष प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे.
🎨 सोलापूरकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन द्यावे तसेच आवडलेली चित्रे विकत घेऊन कलेचा सन्मान करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button