maharashtrapoliticalsocialsolapur

मंगळवेढ्यातील विवाहितेचा संशयस्पद मृत्यू -प्रकरणी अटकेतील आरोपीस पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालय येथून सशर्त जामीन मंजूर !

 

 

 

 

सोलापूर

 

 

धनश्री जगताप मृत्यू प्रकरणी _मंगळवेढा पोलीस ठाण्यात गु.र. क्र. ०१४६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०८, ३५२ व ३(५)_ प्रमाणे संदीप गौतम जगताप (वय ३६, रा. सप्तशृंगी नगर, मंगळवेढा, सोलापूर) व अन्य २ असे एकूण ३ जणाविरुद्ध दिनांक ०७/०३/२०२६ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.
फिर्यादी आप्पासो मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी धनश्री हिचे लग्न दिनांक १६/११/२०२५ रोजी आरोपी संदीप जगताप याच्याशी झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळींकडून तिच्या मानसिक स्थितीबाबत आक्षेप घेण्यात आले व तिला माहेरी पाठविण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. पुढे आरोपी व त्याच्या कुटुंबीयांकडून मयत धनश्री हिच्यावर वारंवार तिच्या आजाराबाबत दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आले होते. दिनांक ०४/०३/२०२६ रोजी मयत धनश्री हिचा सासरी शेतात संशयास्पद मृत्यू झाल्याने सदर गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील आरोपी संदीप जगताप यास अटक करण्यात आले होती. आरोपीने मे. जिल्हा व सत्र न्यायालय पंढरपूर येथे जामिनासाठी आपला अर्ज दाखल केला होता.

 

 

 

 

 

यात आरोपीतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की, ०७/०३/२०२६ रोजी दाखल झालेल्या FIR मध्ये सुरुवातीला केवळ आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असून खुनाचा नाही. आजपर्यंत खुनाबाबत कोणताही ठोस प्रथमदर्शनी पुरावा उपलब्ध नाही. कॉल रेकॉर्डिंगमुळे केवळ उपस्थिती दिसून येते, मात्र त्यावरून गुन्हा सिद्ध होत नाही. तसेच मृत व्यक्ती मानसिक आजारावर उपचार घेत होती व न्युरोलॉजिस्टकडून उपचार सुरू होते. आरोपी ०७/०३/२०२६ पासून कोठडीत असून तपासासाठी पुरेसा कालावधी मिळाला आहे. साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता असल्यास ती योग्य अटी घालून टाळता येऊ शकते. त्यामुळे आरोपीस जामीन मंजूर करावा, अशी विनंती करण्यात आली.

 

 

 

 

 

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर *मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ओ. आर. देशमुख यांनी दिनांक १८/०४/२०२६ रोजी अटकेतील आरोपी संदीप गौतम जगताप यास सशर्त जामीन मंजूर केला.

 

 

 

 

वरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी , ॲड. वैभव बोंगे,ॲड. संकेत पवार,ॲड. साहिल शेख, ॲड. त्वरिता वाघ, ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. मोहीम पठाण, ॲड. मनिष बाबरे, ॲड. रोहित थोरात, यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे ॲड‌. वांगीकर यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button