crimemaharashtrapoliticalsocialsolapur

खून प्रकरणी दोघांना उच्च न्यायालयात जामीन:- ॲड. जयदीप माने…

सोलापूर

 

घटना पूर्व नियोजित नाही क्षणार्धात घडलेली आहे असे मत व्यक्त करून चिंचोली एमआयडीसी मध्ये घडलेल्या खुनाच्या प्रकरणात आरोपींचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने मंजूर केला.
या प्रकरणाची हकीकत अशी की, आरोपी हे चिंचोली एमआयडीसी येथील एका कारखान्यात कामास होते. पाण्याच्या हौदाजवळ आंघोळ करण्याच्या किरकोळ कारणावरून आरोपी पंकज सिंग व मयत गुलशन कुमार यांच्यामध्ये भांडण झाले व या भांडणात आरोपी पंकज सिंग व बलराम पंडित यांनी लाकडाने गुलशन कुमार यांच्या डोक्यात मारहाण करून त्याचा खून केला, या आरोपावरून पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात दोषारोप पत्रक दाखल केले होते.

 

 

 

यातील आरोपी पंकज सिंग व बलराम पंडित यांचा जामीन अर्ज सोलापूर सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर दोन्ही आरोपींनी कोल्हापूर उच्च न्यायालयात धाव घेत ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती श्री. सचिन देशमुख यांच्यासमोर झाली. उच्च न्यायालयात जामीन अर्जाचे सुनावणी वेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी आपल्या युक्तीवादामध्ये घटना पूर्व नियोजित नाही क्षणार्धात घडलेली आहे, केस चा तपास पूर्ण झाला आहे असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी आरोपी पंकज सिंग व बलराम पंडित यांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले .

या प्रकरणी आरोपींतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. ए. एस. साळगावकर यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button