maharashtrapoliticalsocialsolapur

आंबेडकर जयंतीनिमित्त सोनाई फाऊंडेशनचा भव्य उपक्रम; २५ क्विंटल पुलाव व सरबताचे मोफत वाटप, हजारो भीमसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

सोलापूर, प्रतिनिधी

 

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रेल्वे लाईन परिसरात सोनाई फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणारा भव्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भीमसैनिकांसाठी तब्बल २५ क्विंटल पुलाव तयार करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तसेच उपस्थित प्रत्येकास थंडगार सरबताचेही मोफत वाटप करण्यात आले.

 

 

या उपक्रमाचे नेतृत्व सोनाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांनी केले. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी अनेक दिवस नियोजन करून तयारी केली होती. मिरवणूक मार्गावरच सुव्यवस्थित पद्धतीने भोजन व सरबत वितरणाची व्यवस्था करण्यात आली होती, त्यामुळे हजारो भीमसैनिकांनी कोणतीही गैरसोय न होता महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

या उपक्रमात किस्मत चौक मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रेल्वे लाईन यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने गर्दी नियंत्रण, भोजन वितरण व स्वच्छतेची विशेष काळजी घेतली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजऱ्या झालेल्या आंबेडकर जयंतीत या उपक्रमाने वेगळेपण जपले. समाजातील ऐक्य, बंधुता आणि सेवा भाव वृद्धिंगत करणारा हा उपक्रम सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून नागरिकांकडून आणि भीमसैनिकांकडून त्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button