प्रबुद्ध भारत तरुण मंडळाची सोलापुरात लक्षवेधक मिरवणूक
चवदार तळे सत्याग्रह, ऐतिहासिक क्षणाच्या बैलगाडी देखाव्याने स्फुलिंग चेतविले

विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन
सोलापूर
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीमध्ये मिलिंद नगर येथील प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी. बी. ग्रुप) तर्फे कसबे तडवळे येथील ऐतिहासिक बैलगाडी मिरवणूक देखावा आणि शतकोत्तर महोत्सव वर्ष चवदार तळे सत्याग्रह ऐतिहासिक क्षणाचा देखावा लक्षवेधक ठरला. मार्गदर्शन तथा माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या दोन्ही देखाव्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक जीवन कार्याचे दर्शन घडविले. उपस्थितांमध्ये नवे स्फुलिंग चेतविले.

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार , सोलापूर महानगर पालिका सभागृह नेते नरेंद्र काळे, बाळासाहेब गायकवाड ,PB ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आनंद चंदनशिवे , माजी नगरसेवक गणेश पुजारी उपस्थित …
महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते या देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले. भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो यांची मंगल उपस्थिती होती. यावेळी खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, बाळासाहेब वाघमारे, आंबेडकरी चळवळीतील नेते नागसेन कांबळे, डॉ .नितीन ढेपे, चंद्रकांत मडीखांबे,दशरथ कसबे, उद्योजक तुकाराम गायकवाड,उद्योजक पुरुषोत्तम धूत, इंदरमल जैन ,पी. बी. प्रमुख गौतम (महाराज ) चंदनशिवे,भारत बाबरे, लालू खंडेलवाल, काशिनाथ गड्डम, राजू हौशेट्टी ,भारत बाबरे,सुहास सावंत, इरफान शेख, बापू जाधव, सुहास सावंत, श्रीमंत जाधव, सिद्धार्थ कसबे, बबन शिंदे , सोमेश शिरसागर, डॉ. संघप्रकाश दुड्डे ,पी. बी. ग्रुप अध्यक्ष प्रवीण शिंदे,अश्विन सोनवणे, रोहन गायकवाड यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
बुधवार पेठ, मिलिंद नगरातील प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी. बी. ग्रुपच्या वतीने यंदाच्या भीम जयंती मिरवणुकीत इतिहासाला उजाळा देणारा भव्य आणि लक्षवेधी देखावा साकारला.यावेळी १९४१ मधील ऐतिहासिक कसबे तडवळे परिषदेला केंद्रस्थानी ठेवत ऐतिहासिक बैलगाडी मिरवणुकीचा देखावा आणि 20 मार्च 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक चवदार तळे हा सत्यागृह केला होता. त्या क्षणाच्या आठवणीला उजाळा दिला आहे, असे मार्गदर्शक तथा माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी सांगितले.
डॉ. आंबेडकरांचे विचार कृतीत आणण्यासाठी कटिबद्ध
1952 मध्ये या मंडळाची स्थापना झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष कृतीत उतरवणे, हीच आमची भूमिका आहे. सामाजिक एकता, शिक्षण आणि संघटनेच्या बळावर समाज उभारणीचा संदेश या देखाव्यातून दिला आहे. तरुण पिढीने इतिहासातून प्रेरणा घेऊन पुढे यावे, हा आमचा प्रामाणिक उद्देश आहे, असे माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी सांगितले.
भीम जयंतीमुळे नवीन ऊर्जा मिळते : अण्णासाहेब बनसोडे
सोलापुरातील भीम जयंती आणि मिरवणूक ही सर्वात मोठी मानली जाते. मी सोलापूर जिल्ह्यातील सुपुत्र आहे. प्रत्येक भीम जयंती मिरवणुकीला मी सहकुटुंब उपस्थित राहतो. डॉ. आंबेडकरांचे विचार हे जगाला तारणारे आहेत. या मिरवणुकीमुळे नवी ऊर्जा मिळते. प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे, अशी भावना विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केली.
—-
स्व .अजित दादांना अश्रूपूर्ण नयनांनी श्रद्धांजली

मिरवणुकीत विशेषतः लक्ष वेधून घेतले ते महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व.अजित दादा पवार यांचे LED स्क्रीन वर प्रसारीत करण्यात आलेल्या फोटो मुळे.दादांच्या फोटोस मिरवणुकी पूर्वी श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी दादांच्या आठवणींना उजाळा मिळाला.यावेळी उपस्थित जनसमुदायाने विकासाचा वादा अजित दादा, अमर रहे अमर रहे अजित दादा पवार अमर रहे या घोषणा दिल्या.



