entertainmentmaharashtrapoliticalsocialsolapur

सालाबादप्रमाणे रमजाननिमित्त थोरला मंगळवेढा तालीम व पंजाब तालीमकडून रोजा इफ्तारचे आयोजन; सामाजिक सलोख्याचा संदेश…

सोलापूर

 

पवित्र रमजान महिन्यानिमित्त शहरातील थोरला मंगळवेढा तालीम व पंजाब तालीम यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जोपासण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात विविध समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सोमपा गटनेते अमोल बापू शिंदे आणि माजी सभापती मनपा शिक्षण मंडळ संकेत भाऊ पिसे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. सन २००७ पासून थोरला मंगळवेढा तालीमच्या माध्यमातून रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन सातत्याने केले जात आहे. त्या वेळी तत्कालीन पोलीस आयुक्त स्व. अशोक कामठे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम सुरू करण्यात आला होता.

 

 

 

 

महाराष्ट्रातील गणेशोत्सव मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या उपक्रमांपैकी हा एक अग्रगण्य उपक्रम मानला जातो.यंदाच्या कार्यक्रमाची सुरुवात सोलापूर शहर पोलीस उपआयुक्त गौहर हसन आणि उपायुक्त विजय कबाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. रमजान महिन्याच्या पावित्र्याचा सन्मान राखत सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येत रोजा सोडला आणि एकात्मतेचा संदेश दिला.

 

 

यावेळी नगरसेवक तोफिक भाई हत्तुरे, नगरसेवक चेतनजी नरोटे, मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, एमआयएम शहराध्यक्ष शौकत भाई पठाण, राजू भाई कुरेशी, राजूभाई हुंडेकरी, नगरसेवक अझरभाई हुंडेकरी, माजी नगरसेवक रियाज भाई खरादी, करीमभाई लोखंडवाला, युवा नेते ज्ञानेश्वर आप्पा सपाटे, युवा नेते सागर पिसे, सोहेल भाई कुरेशी, समीर भाई शेख, प्रसाद कुमठेकर, वाहिद विजापुरे, समीर लोंढे, जावेद वाडर सर, इब्राहिम भाई शेख, इम्तियाज भाई कमिशनर, गफूर दादा शेख, अल्फरान आबादीराजे यांच्यासह अनेक मान्यवर आणि रोजा सोडणारे असंख्य मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व समाजातील नागरिकांनी एकत्र येत बंधुभाव, ऐक्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश दिला…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button