crimemaharashtrapoliticalsocialsolapur

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती अपहार प्रकरणी अटक आरोपीना पोलीस कोठडी…

प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार...

 

 

 

सोलापूर

 

 

येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांनी बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळा प्रकारणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी आर. एस. मुसळे व बाळासाहेब शिंदे यांना दि 18/3/2026 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश यांनी पारित केला. यात आरोप असा की, बांधकाम कामगारांच्या मुलासाठी असलेल्या विविध शैक्षणिक योजनेमध्ये बनावट बोनाफाईड, शैक्षणिक कागदपत्रे सादर करून शासनाची रक्कम रुपये ३ कोटी ६३ लाख २० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने दि. ४/०३/२०२६ गुन्हा रजिस्टर नंबर २५०/२०२६ अन्वये फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दुकाने निरीक्षक (सुविधाकार), कंत्राटी कर्मचारी, दलाल आणि शिष्यवृत्ती लाभार्थी अशा एकूण २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.

 

 

 

या गुन्ह्यामध्ये सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वर नमूद आरोपीना दि 14/03/2026 रोजी अटक करुन आजरोजी दि 15/03/2026 में न्यायालया समोर हजर करुन तपास अधिकाऱ्यांनी तपासकामी 5 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. प्रकरणातील आरोपीचे वकिल ॲड. शशी कुलकर्णी यांचा युक्तिवाद तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून में न्यायालयाने आरोपीस 3 दिवस दि 18/03/2026 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

 

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची अधिकृत खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराने  K City News शी बोलताना सांगितली..

 

 

यात आरोपीतर्फे अॅड. शशी कुलकर्णी, ॲड.गुरुदत्त बोरगांवकर, अॅड. प्रसाद अग्निहोत्री हे काम पाहत आहेत. कोर्ट- श्रीमती ए. एस. जाधव. तपास अधिकारी – निलेश पाटील – सोनवणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button