crimemaharashtrapoliticalsocialsolapur

विजापूर बायपास रोडवर भीषण अपघात : इफ्तारनंतर बाहेर पडलेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू; सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी…

सोलापूर

 

शहरालगतच्या विजापूर बायपास रोडवर गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. इफ्तारनंतर चहा पिण्यासाठी व फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या या दोन्ही तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, रमजान महिन्यामुळे दोन्ही तरुणांनी सायंकाळी इफ्तार करून घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी आणि चहा पिण्यासाठी बाहेर पडले होते. त्यावेळी विजापूर बायपास रोड परिसरात त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की दोन्ही तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला व पंचनामा केला. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह सोलापूर येथील शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

 

 

 

दरम्यान, ही दुर्दैवी घटना समजताच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृतांच्या नातेवाईकांसह मित्रपरिवार आणि ओळखीच्या व्यक्तींची मोठी गर्दी झाली होती. अचानक घडलेल्या या अपघातामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button