crimemaharashtrapoliticalsocialsolapur

कष्टाचा संसार काही क्षणात राख, आता समाजाने आधार द्यायची वेळ..!

सोलापूर

HTML img Tag Simply Easy Learning

दक्षिण सोलापूर ता. आहेरवाडी येथील इरेश भागण्णा बोरूटे यांच्या घराला मंगळवारी सकाळी अचानक शॉक सर्किटमुळे भीषण आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. या आगीत सोने-चांदी, रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य जळून सुमारे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे. कष्टाने उभा केलेला संसार काही क्षणात राख झाल्याने बोरूटे कुटुंब मोठ्या संकटात सापडले असून सध्या हे कुटुंब उघड्यावर आले आहे.

 

 

सुदैवाने घरातील सर्व सदस्य वेळेत बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.घटनेची माहिती मिळताच अतिथी प्युअर व्हेज, कुंभारी तथा एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जनसेवक महादेव कोगनुरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बोरूटे कुटुंबीयांची भेट घेतली, त्यांना धीर दिला आणि मदतीचा हात पुढे केला.

 

 

बोरूटे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे कुटुंब आहे. त्यांच्या आयुष्यात अचानक आलेल्या या कठीण प्रसंगी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या कुटुंबाला सढळ हाताने सहकार्य करावे,अशी भावनिक व मनापासून विनंती जनसेवक महादेव कोगनुरे यांनी केली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button