maharashtrapoliticalsocialsolapur

लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजीमहाराजांना राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन….

सोलापूर

रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्याची उभारणी करणारे आणि जनतेच्या मनामनात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ शूर योद्धे नव्हते, तर लोककल्याणकारी आणि न्यायनिष्ठ राज्यव्यवस्थेचे दूरदर्शी प्रणेते होते. अन्याय, अत्याचार आणि परकीय सत्तेविरुद्ध त्यांनी उभारलेला संघर्ष हा फक्त सामर्थ्याचा नव्हे, तर स्वत्व, सन्मान आणि अस्मितेचा लढा होता. हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि छत्रपती शिवाजीमहाराज की जय अशा घोषणा देत सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या .

 

 

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश सचिव आनंद मुस्तारे माजी सभागृह नेते मगबुल मोहळकर जेष्ठ नेते हेमंत चौधरी जेष्ठ नेते श्रीनिवास कोंडी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले लिगल सेल अध्यक्ष जयप्रकाश भंडारे चित्रपट सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर सोशल मिडीया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी अमोल कळम निशांत तारानाईक आदी उपस्थित होते ..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button