शिवप्रभु प्रतिष्ठानतर्फे श्री शिवजन्मोत्सव प्रतिष्ठापना जिजाऊंच्या लेकींच्या हस्ते संपन्न

सोलापूर
शिवप्रभु प्रतिष्ठान यांच्या वतीने छत्रपती श्री संभाजी महाराज चौक येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीची प्रतिष्ठापना जिजाऊंच्या लेकींच्या हस्ते ढोल-ताशांच्या निनादात व श्री शिवआरतीच्या गजरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जिजाऊंच्या लेकी व शिवभक्तांच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

कार्यक्रमास भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, मोनिका देवेंद्र कोठे, भाजपा सरचिटणीस सुधा अळीमोरे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा तथा नगरसेविका रंजिता चाकोते, नगरसेविका सुनिता सुनिल कामाठी, अलका आनंद भंवर, मंदाकिनी तोडकरी, सोमपाचे पहिल्या माजी उपमहापौर सुषमा मुरलीधर घाडगे, प्रतिभा पद्माकर उर्फ नाना काळे, दुर्गा आनंद कोलारकर, धनश्री विनोद भोसले, अर्चना आशुतोष बरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर शहरात श्री शिवजयंती थाटात आणि मोठ्या प्रमाणात साजरी करण्यासाठी ज्या शिवभक्तांनी अहोरात्र परिश्रम घेतले, त्या कार्यात अग्रस्थानी असलेले पुरुषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रभु प्रतिष्ठान ची सामाजिक व विधायक कार्याची अखंड सेवा सुरू आहे.
शिवभक्तांना एकत्रित करून उत्सवाचे सुयोग्य नियोजन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांद्वारे प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत आहे. शिवजयंती उत्सवाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असून, शहरातील युवकांना प्रेरणा देण्याचे कामही या माध्यमातून केले जात आहे. “जय जिजाऊ, जय शिवराय” या घोषवाक्याने प्रेरित होऊन शिवप्रभु प्रतिष्ठानची सेवा आणि समाजकार्याची परंपरा अविरत सुरू आहे.
आलेल्या सर्व जिजाऊंच्या लेकी, मान्यवर व शिवभक्तांचे आत्मीयतेने स्वागत श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या कार्याध्यक्षा उत्तरा बरडे – बचुटे यांनी केले.
“जय जिजाऊ, जय शिवराय”, “जय भवानी, जय शिवाजी”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “छत्रपती संभाजी महाराज की जय” अशा जयघोषांनी उत्सव मंडप परिसर दणाणून गेला. तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आले.
यावेळी ॲड. नलिनी जगताप, सुनिता पाटील, निर्मला शेळवणे, मोहिनी चटके, चारुशीला जगदाळे, संजीवनी मुळे, डॉ. प्रियांका धुळप, सुरेखा जगताप, वैशाली सातपुते, स्वाती रूपनर, पूजा परदेशी आदींसह शेकडो जिजाऊंच्या लेकी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी माने यांनी केले.
तसेच आलेल्या मान्यवर व शिवभक्तांचे स्वागत शिवप्रभु प्रतिष्ठान वतीने मार्गदर्शक आशुतोष बरडे व समर्थ बरडे यांनी केले.



