सामाजिक कार्यकर्ते , लोकप्रतिनिधी , पत्रकार यांना विश्वासात घेऊन प्रशासनाने सोलापूरचा पाणी प्रश्न मार्गी लावावा :- आण्णासाहेब बनसोडे …
नागपूर येथे विधानसभा उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे यांनी सोलापूरच्या प्रश्नावर घेतली शासकीय , अधिकारी , लोकप्रतिनिधी , सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते ,पत्रकार यांची एकत्रित बैठक...

सोलापूर
सोलापूरचे अनेक प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत.याच प्रश्नावर विधानसभा उपसभापती आण्णासाहेब बनसोडे यांनी नागपूर येथे महत्वाची बैठक बोलावली होती.या बैठकीस व्यासपीठावर शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे ,प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी नगरसेवक गणेश पुजारी यांची उपस्थिती होती.

यावेळी सोलापूरच्या सद्यस्थितीत असणाऱ्या पाणी प्रश्नावर सोलापूरहून आलेल्याला पत्रकारांनी, पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी – कार्यकर्त्यांना आवाज उठविला.सोलापूर महानगरपालिकेने जाहीर केल्या प्रमाणे सोलापूरचा पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने विधानसभा उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे यांनी सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना धारेवर धरले. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांचा सोहळा जवळ आला असून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे यांनी आवाज उठवला .
माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी सोलापूर महापालिका पाणीपुरवठा बाबतीत निष्काळीपणा दाखवत असून ह्या पाणी पुरवठ्याचा महत्वाचा विषय MGP कडे वर्ग करण्यात यावा अशी आग्रही मागणी डोंगरे यांनी आण्णासाहेब बनसोडे यांच्याकडे केली.दुहेरी पाईप लाईनचा प्रश्न प्रलंबित असून तो प्रश्न सोलापूर महापालिकेने का सोडवला नाही? हा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला.

पाणीपुरवठ्यासाठी सोलापूर महापालिकेने मागणी केलेले ८०० कोट रुपये शासनाकडून कधी मिळणार ? रात्री बेरात्री सोलापूर महापालिकेने आवेळी पाणी सोडणे बंद करावे. सोलापूर महानगर पालिकेच्या निष्काळजीपणामुळे हद्दवाढ भागाला सुरळीत पाणीपुरवठा मिळत नाही. यंत्रणेकडे आवश्यक कर्मचारी नाहीत.याचा फटका स्थानिक नागरिकांना बसतोय असा प्रश्न उपस्थित केला.

माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी सोलापूर शहर वासियांकडून कर स्वरूपात लुटमार करतात.कर आकारणी प्रमाणे सोलापूरकरांना कोणत्याही सेवा – सुविधा मिळत नाही .कामचुकार अधिकारी – कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करा .सामाजिक संघटना ,लोकप्रतिनिधी यांच्या प्रमाणे लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार हे देखील पोट तिडकीने पाणी प्रश्नावर आवाज उठवितायत तरी यावर सोलापूर महानगर पालिका प्रशासनाने तातडीने मार्गी लावावा अशी मागणी आण्णासाहेब बनसोडे यांच्याकडे केली.

आनंद चंदनशिवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत सोलापूरच्या पाणी प्रश्नावर विधानसभा उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे यांनी महत्वाची बैठक घेतली. सोलापूरच्या पाणी प्रश्नावर नक्कीच तोडगा काढू असा शब्द अजित दादांनी दिल्याचे सांगितले .
सोलापूर महानगर पालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी सोलापूरचा पाणी प्रश्न सुरळीत व्हायला १ ते दीड वर्ष लागतील असे सांगितले. तात्पुरता हा प्रश्न पाच दिवसाआड आहे तो दोन दिवसांवर येण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू असा शब्द विधानसभा उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे यांना दिला.

त्याच प्रमाणे बाळे,केगाव , शेळगी येथील खंडित वीज पुरवठ्याबाबत आनंद चंदनशिवे,गणेश पुजारी यांनी प्रामुख्याने मुद्दा उपस्थित केला. रमाई आवास योजनेच्या बाबतीत लाभार्थ्यांना वंचित ठेवले जात आहे. या विभागाचे अधिकारी निष्काळजीपणा दाखवत आहेत .संबंधित अधिकाऱ्यांना सूचना कराव्या अशी मागणी विधानसभा उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे यांच्याकडे केली .

यावेळी शत्रुघ्न कांबळे , सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे , VJNT सेल विभाग अध्यक्ष रुपेशकुमार भोसले, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे, इरफान शेख शासकीय सेवेतील सोलापूर महानगर पालिकेचे अधिकारी कर्मचारी ,नगरविकास विभागाचे सचिव, विद्युत विभागाचे अधिकारी कर्मचारी , यांची उपस्थिती होती.



