आमदार देवेंद्र कोठे यांनी आमदारकीच्या वर्षभरात 100 कोटींचा निधी आणून दमदार काम केल्यानिमित्ताने शिवराम प्रतिष्ठान च्या वतीने विशेष सन्मान

सोलापूर
आमदार देवेंद्र कोठे यांनी आमदारकीच्या वर्षभरात 100 कोटींचा निधी आणून दमदार काम केल्यानिमित्ताने शिवराम प्रतिष्ठान च्या वतीने सन्मान करण्यात आला
शिवराम प्रतिष्ठानच्या वतीने शहर मध्य चे आमदार देवेंद्र कोठे यांच्या आमदारकीस यशस्वी वर्षपूर्ती व सामुदायिक विवाह सोहळा उत्कृष्टपणे पार पडल्याबद्दल
आमदार देवेंद्र कोठे यांचा सन्मान केला, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी हा सन्मान स्वीकारला,यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर,विजय कुलथे, नागेश सरगम,श्रीकांत वाडेकर,बापू वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी श्रीकांत वाडेकर यांनी आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या वर्षभराच्या कामाचे कौतुक केलं.
यावेळी मनोगत व्यक्त करताना गुरुशांत धुत्तरगावकर यांनी गेल्या 15 वर्षात जितका निधी मतदारसंघात आला नव्हता तेवढा आमदार देवेंद्र कोठेंनी 1 वर्षात आणला असे सांगत प्रत्येक कामाचा पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेण्यात देवेंद्र दादांचा हातखंडा आहे असे ते म्हणाले.यावेळी शिवराम प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थित होते.



