अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास वीस वर्षाचा कारावास:- ॲड .शीतल डोके…

सोलापूर
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश डी एन सुरवसे यांनी आरोपीस वीस वर्षे कठोर कारावास व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अंबादास लक्ष्मण गावडे (वय 36 , राहणार मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर ) असे शिक्षा झालेल्या चे नाव आहे. याबाबत पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादी वरून मंद्रूप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील पीडिता ही तीन मे 2020 रोजी घरातून निघून गेल्याने तिचे नातेवाईक तिचा शोध घेत होती त्यावेळी पिडीता ही अंबादास गावडे यांच्या घरातून येताना दिसली त्यामुळे नातेवाईकांना संशय आल्यानंतर घरी आल्यानंतर त्यांनी पिडीतेला विश्वासात घेऊन विचारपूस केली त्यावेळी पिडीतेने सांगितले की अंबादास गावडे याने पीडीतेला घरात बोलावून तुझ्या घरच्यांना मारून टाकीन अशी धमकी देत तिच्याशी शरीर संबंध केली असे सांगितले.
असा प्रकार आरोपीने वारंवार केला असल्याचेही पिडीतेने सांगितले त्यामुळे याबाबत मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगूवाले यांनी आरोपीस अटक करून तपास केला व न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले
याची सुनावणी विशेष न्यायाधीश सुरवसे यांच्यासमोर झाली साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी वकिल शीतल डोके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश सुरवसे यांनी आरोपी गावडे यास वीस वर्षे कठोर कारावास व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
याप्रकरणी सरकारच्या वतीने ॲड .शीतल डोके, एडवोकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले कोर्ट भैरवी म्हणून पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार जाधव प्रिया जाधव पोलीस शिपाई पूजा काळे अनिता काळे यांनी काम पाहिले



