maharashtrapoliticalsocialsolapur

महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार

दिनदर्शिकेचेही प्रकाशन : अक्षय अंजिखाने मित्रपरिवार आणि बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराचा उपक्रम...

 

सोलापूर : प्रतिनिधी

जगतज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाकरिता २० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल अक्षय अंजिखाने मित्रपरिवार आणि बसवेश्वर सर्कल मित्र परिवारातर्फे आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार करण्यात आला. जगतज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा परिसरात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अक्षय अंजिखाने यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

 

याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. शिवरत्न शेटे भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी सभागृह नेते सुरेश पाटील माजी नगरसेवक जगदीश पाटील अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघाचे पंडित वेणुगोपाल जिल्ला पंतलू, श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त प्रभुराज मैंदर्गीकर, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, चन्नवीर चिट्टे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, केदार उंबरजे, बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे गणेश चिंचोळी, आनंद मुस्तारे, संजय साळुंखे, श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे मानकरी मनोज हिरेहब्बू, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, अनिल पल्ली, कार्यक्रमाचे संयोजक आणि भाजपाचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने उपस्थित होते.

 

 

 

याप्रसंगी शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे म्हणाले, सोलापूर शहराला महाराष्ट्रातील इतर शहरांच्या तुलनेने मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. श्री सिद्धरामेश्वर आणि महात्मा श्री बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांच्या विकासासाठी २ कोटी रुपयांचा विकास निधी आमदार देवेंद्र कोठे यांनी आणला आहे. भाजपाचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने यांनी प्रयत्न करून जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी २० लाख रुपयांचा निधी खेचून आणला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे, असेही डॉ. शिवरत्न शेटे यांनी सांगितले.

 

 

 

 

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी भाजपाचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने आणि बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराने कौतुकास्पद पाठपुरावा केला. या कामाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे आग्रही आहेत. येथे होणाऱ्या सुशोभीकरणाच्या कामासाठी आणखी जितका निधी लागेल तो निधी देण्याचे त्यांनी मान्य केलेले आहे, असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी सांगितले.

 

 

 

 

 

कार्यक्रमाचे संयोजक आणि भाजपाचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने म्हणाले, बसवेश्वर सर्कल मित्र परिवारातर्फे महात्मा श्री बसवेश्वर महाराजांची नित्य पूजा करण्यात येत होती. परंतु पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याची आवश्यकता होती. ही मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी तत्काळ २० लाख रुपयांचा निधी महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर विकासासाठी मंजूर केला. लवकरच हे काम पूर्णत्व जाईल, असेही अक्षय अंजिखाने यांनी याप्रसंगी सांगितले.

 

 

 

 

 

याप्रसंगी सागर आतनुरे, राजकुमार हंचाटे, वेणूगोपाळ जिल्ला पंतलू, केदार उंबरजे, गुरुराज पद्मगोंडा, गणेश चिंचोळी, आनंद मुस्तारे, विजय कुलथे, संजय साळुंखे, भीमाशंकर पडमगोंड, आशिष दुलंगे, तुषार पवार, महेश जेऊर, सतीश पारेली, अमर गट्टी, अभिराज शिंदे, किरण मडूर, अमित चडचणकर, बाबुराव क्षीरसागर, यतिराज होनमाने, सुरज पाटील, कल्पक पुदाले, रोहित परीटसह लिंगायत समाजातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————
चौकट

अक्षय अंजिखाने आणि बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराचे मान्यवरांकडून कौतुक

जगतज्योती महात्मा श्री बसवेश्वर महाराजांच्या पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी भाजपाचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने आणि बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराने केलेल्या कौतुकास्पद पाठपुराव्यामुळे या कामास गती मिळाली आहे. याबद्दल उपस्थितांकडून अक्षय अंजिखाने आणि बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराचे कौतुक करण्यात आले.
————
चौकट

कैलासवासी ओंकार पद्मगोंडा यांची स्वप्नपूर्ती

कैलासवासी ओंकार हा तरुण अगदी लहानपणापासून महात्मा श्री बसवेश्वर महाराजांच्या पुतळा परिसराची नित्यनियमाने स्वच्छता व सेवा करत होता. सोलापूर शहर स्मार्ट होत असताना महात्मा श्री बसवेश्वर महाराजांचा परिसर देखील स्मार्ट झाला पाहिजे याकरिता त्याने त्याची व्यथा अक्षय अंजिखाने व सागर अतनूरे यांना बोलून दाखवली होती. तेव्हापासून या कामाचा सुरू असलेला पाठपुरावा तत्कालीन पालकमंत्री विखे पाटील साहेबांनी २५ लाख रुपयांचा निधी व पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून २० लाखांचा निधी मंजूर करून दिले. त्यामुळे ओंकारचे स्वप्न पूर्णत्वास होत आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button