educationalmaharashtrapoliticalsocialsolapur

स्थानिक गुन्हे शाखेकडून सांगोला तालुक्यात अवैध वाळू उपसावर धडाकेबाज कारवाई…

जेसीबीसह ट्रॅक्टर-ट्रॉली, वाळू असे एकुण १४,५७,०००/- रू. किमतीचा मुद्देमाल जप्त....

पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका २०२६ च्या अनुषंगाने जिल्हयात व जिल्हयातील सीमावर्ती भागात अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक, श्री संजय जगताप व त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्यावरून वपोनि श्री संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा, यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून अवैध धंदयावर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते.

 

 

 

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक  संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार/ विरेश कलशेट्टी, पोलीस शिपाई/ यश देवकते असे अवैध धंदयावर कारवाई करणेकामी सांगोला पोलीस ठाणे येथे हजर असताना गोपणीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे कोळा ता. सांगोला जि. सोलापूर या गावच्या लगत असलेल्या ओढयाच्या पात्रातून आबा कोळेकर व एक अज्ञात इसग जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा करून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरून त्याची चोरून वाहतूक करून विक्री करीत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने, सदर बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, सोलापुर ग्रामीण तपास पथक बातमीच्या ठिकाणी पोहोचुन छापा टाकला असता, जेसीबीच्या सहाय्याने वालु भरीत असलेले ट्रॅक्टर-ट्रॉली जागेवर सोडून जेसीबी व ट्रॅक्टर चालक पळून गेले, सदर ठिकाणावरील मुद्देमाल गुन्हयाचे कामी जप्त करून आरोपीतावर खालीलप्रमाणे सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आले.

 

 

 

 

या गुन्हयात मौजे कोळा ता. सांगोला या लगत असलेल्या ओढयान्या पात्रातुन ९,००,००/- रू. किंमतीचे जेसीबी इंडीया कंपनीचे एक जेसीबी, ५,५०,०००/- ऊ किंमतीचे ट्रॅक्टर-ट्रॉली, ७,०००/- ऊ किंमतीचे एक ब्रास वाळू असे एकुण १४,५७,०००/- रू किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आले असून पुढील तपास पोह/भरमशेटटी सांगोला पोलीस ठाणे हे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक,  अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रितम यावलकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर ग्रामीण कडील सपोनि विशाल वायकर, पोलीस हवालदार विरेश कलशेट्टी, पोकों/यश देवकते यांनी बजावली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button