जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी चौक पोलिसांकडून गांजा विक्री करणाऱ्या इसमाला अटक २ किलोचा गांजा जप्त….

सोलापूर
भारत सरकार यांच्या “नशामुक्त भारत अभियान” तसेच आगामी जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणूकीचे पार्श्वभूमीवर सांगली जिल्हयातील अंमली पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमलीपदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी संदीप घुगे, पोलीस अधिक्षक सांगली, श्रीमती कल्पना बारवकर, अपर पोलीस अधिक्षक सांगली व प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांनी विशेष सूचना देवून गांजा वितरण व विक्री करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते.
या आदेशाप्रमाणे संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत अंमली पदार्थांचा साठा, विक्री व वितरण करणारे इसमांबाबत माहीती उपलब्ध करुन त्यांचेवर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील डि.बी. पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सुचित केले होते. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी.बी. पथकाने वेळोवेळी नशाखोरी विरोधी कारवाईत सातत्य राखत यापूर्वी नशेचे इंजेक्शन, गांजा कारवाई, नशा करण्यासाठी वापरण्यात येणा-या नशेच्या गोळ्या, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधी तंबाखू व गुटखा यांचेवर जास्तीत जास्त प्रभावी कायदेशीर कारवाई करुन नशेखोरीच्या अवैध व्यवसायाचा समूळ बीमोड करण्याच्या उपाययोजना राबवित नशाखोरी व अंमलीपदार्थ विक्री रोखण्याचे अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीपणे छापा कारवाई करुन उत्कृष्ठ कामगिरी केली होती. सदर अंमलीपदार्थ विरोधातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेच्या सातत्यपूर्ण व उत्कृष्ठ कारवाईची मा. पालकमंत्री, सांगली जिल्हा यांनी दखल घेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेच्या पथकाचे जाहीरपणे कौतुक करीत पथकास प्रशंसापत्र देवून सन्मानीत केले होते.
मा. वरीष्ठांचे आदेशाप्रमाणे नशाखोरी व अंमलीपदार्थ विक्री रोखण्याचे अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील पोलीस पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत अंमली पदार्थांचा साठा, विक्री व वितरण करणारे इसमांबाबत माहीती घेत असताना संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांना दि. २९.०१.२०२६ रोजी गोपनीय माहीती मिळाली की, सांगली जिल्हयात तसेच कर्नाटक राज्यात अवैधरीत्या गांजाविक्रीचे गुन्हे दाखल असलेला सराईत संशयीत नामे नवाज सलीम मकानदार हा नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करणेसाठी मिरज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे पाठीमागील बाजूचे बोळात येणार आहे, अशी खात्रीलायक बातमी मिळाली. सदर बातमीवरुन संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी. बी. पथकास रवाना करुन सदर इसमावर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले.
डी. बी. पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळाले बातमीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे पाठीमागील बाजूचे बोळाजवळ पंच, फोटोग्राफर यांचेसह जावून तेथे सापळा रचून थांबले असता थोड्या वेळात सदर ठिकाणी एका मोटारसायकलवरुन एक संशयित इसम येवून थांबला. त्याचा मिळाले बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने त्यास पळून जाणेची संधी न देता शिताफीने ताब्यात घेवून त्याचेवर कायदेशीर कारवाई करीत संशयित इसम नामे नवाज सलीम मकानदार, वय ३२, रा. प्रताप कॉलनी, रॉकेल डेपो झोपडपट्टी, मिरज याचेकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे गांजा नामक अंमली पदार्थाचा एकूण ५०,०००/- रु. चा २ किलो वजनाचा तयार गांजामालाचा साठा जप्त केला असून त्याचेकडे कौशल्यापर्ण तपास केला असता. तो हा तयार गांजामाल मिरज परीसरात चढ्या दराने किरकोळ स्वरुपात विक्री करुन वितरण करीत असल्याचे निष्पन्न झालेने त्याचे विरुध्द वर नमूद प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यास सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करुन त्यास मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता त्यास मा. न्यायालयाने दि. ०२.०२.२०२६ रोजीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करीत आहेत.
महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडून “नशामुक्त भारत अभियान” पार्श्वभूमीवर तसेच आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणूकीचे अनुषंगाने नशायुक्त पदार्थ व गुटखा विक्री तसेच वितरण करणा-या व्यवस्थेची पाळेमुळे खणून काढणेच्या अनुषंगाने अंमली पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमलीपदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येत असून नागरीकांनी नशायुक्त पदार्थाबाबत माहीती पोलीस प्रशासनास देण्याचे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेतर्फे आवाहन करण्यात येत आहे….



