maharashtrapoliticalsocialsolapur

अखेर बसव प्रेमींची मागणी मान्य 15 एप्रिल पूर्वी पुतळा उभारणार….

 

महापालिकेने दिले आश्वासन

सोलापूर

 

 

महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा 19 एप्रिलच्या जयंतीपूर्वी उभारण्यात यावा या मागणीसाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील बसव प्रेमींनी काल एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
खा. प्रणिती शिंदे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, प्रकाश वाले, नरेंद्र गंभीरे, डॉ. शिवरत्न शेटे, मनीष काळजे, राज पाटील, प्रकाश हत्ती, डॉ. प्रकाश घटोळे, उदयशंकर चाकोते, सुदीप चाकोते, ऍड. राजशेखर पाटील, प्रा. भीमाशंकर बिराजदार, श्रीशैल बनशेट्टी, रेवणसिद्ध आवजे, बसवराज बगले, चंद्रकांत रमणशेट्टी, शिवलिंगप्पा शाबादे, आनंद मुस्तारे, सचिन शिवशक्ती, राजशेखर विजापुरे, गणेश चिंचोळी, विश्वनाथ आमणे, अशोक भांजे, विजयकुमार बिराजदार, सोमनाथ चौधरी, वीरेंद्र हिंगमिरे, सकलेश बाबुळगावकर, पुष्पा गुंगे, प्रार्थना बिज्जरगी, स्मिता नाईक, सुरेखा बावी, राजश्री थळंगे, गुरुराज पदमगोंडा, सागर अतनुरे, विकास हिरेमठ, राहुल जत्ती उपस्थित होते.

 

 

आंदोलनाची तीव्रता पाहून महापालिकेचे नगरअभियंता सारिका आकुलवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सोमवारपासून कामात सुरुवात करणार असून 15 एप्रिल पूर्वी पुतळा उभारणार असल्याचे जाहीरपणे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजशेखर बुरकुले यांनी प्रास्ताविक अमित रोडगे तर आभारप्रदर्शन वीरेंद्र हिंगमिरे यांनी केले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button