maharashtrapoliticalsocialsolapur

पालकमंत्री गोरेंचा मास्ट्रर स्ट्रोक भाजपमधील गटतट सांभाळून सर्व समाजाला दिला न्याय….

 

 

सोलापूर

 

महापालिकेतील तीनही महत्वाच्या पदांवर भाजपामधील गटतटांना सांभाळून सर्व समाजाला सामावून घेण्याची किमया पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलीय. महापौरपदी विनायक कोंड्याल, सभागृह नेता म्हणून नरेंद्र काळे तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांना संधी देऊन दोन्ही देशमुख आणि कोठे गटात समन्वयाची भूमिका ठेवली. तीनही निवडी करताना समाजघटनांचा विचारही करण्यात आला.

 

 

 

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात सोलापूर महापालिका निवडणूकीत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला. 102 पैकी तब्बल 87 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर आता महापौरांसह इतर पदांवर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा गेली पंधरा दिवस सुरु होती. भाजपामधील दोन्ही आमदारव्दय देशमुख आणि आ. कोठे यांच्या गटातील अनेकांनी पदांसाठी लॉबिंग सुरु केले. आ. विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव डॉ.किरण देशमुख, नरेंद्र काळे, विनायक कोंड्याल, अनंत जाधव यांची नावे महापौर पदासाठी चर्चेत होती. मराठा, धनगर आणि पद्मशाली समाजाने महापौरपदावर दावा करीत संधी देण्याची मागणी केली. दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेत गटातटाचा प्रश्नही उपस्थित झाला.

 

 

 

 

 

यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मास्ट्ररस्ट्रोक मारत प्रथम गटनेता म्हणून आ. विजयकुमार देशमुख गटाचे नरेंद्र काळे यांची निवड केली. नरेंद्र काळे हे धनगर समाजाचे आहेत. त्याच बरोबर संघाच्या मुशीत वाढलेले आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीनंतर अनेकांची तोंडे बंद झाली. दरम्यान सोमवारी (दि.2) महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यावेळी महापौरपदासाठी विनायक कोंड्याल तर उपहापौरपदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांनी अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पद्मशाली समाजाचे तसेच कोठे गटाचे विनायक कोंड्याल हे चौथ्यांना नगरसवेवक म्हणून निवडून आले आहेत. संयमी आणि मितभाषी म्हणून त्यांची ओळख आहे.

 

 

 

 

 

 

उपमहापौरपदासाठी मराठा समाजाच्या ज्ञानेश्वरी देवकर यांची निवड सर्वांसाठी आश्चर्यचकीत करणारी होती. आ. सुभाष देशमुख यांचे समर्थक असलेले आणि मराठा म्हणून देवकर यांना संधी देत पालकमंत्री गोरे यांनी सिक्सर मारला. आता राहता राहिला लिंगायत समाजाचाला संधी देण्यासाठी स्थायी समिती तसेच स्विकृत नगरसेकव असे अनेक पर्याय शिल्लक आहेत. सोलापुरातील गटतट आणि सामाजिक समतोल राखत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पदाधिकाऱ्यांची निवड केल्याचे दिसते. त्यांच्या या खेळीने पक्षांतर्गत विरोधकही बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे.
—–
पुढील निवडीही सर्वसमावेशक होणार

 

महापालिकेत आता स्थायी समिती सभापती, नऊ स्विकृत नगरसेवक, स्थायी समिती सदस्य, परिवन समिती सभापती, शिक्षण मंडळ सभापती हि प्रमुख पदे शिल्लक आहेत. सोलापुरकरांनी भाजपाला भरभरुन दिलेला प्रतिसाद पाहता सर्व समावेशक आणि सामाजिक समतोल राखत या निवडी होणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या खेळीवरुन दिसून येते. निष्ठावंत कार्यकर्त्यांना न डावलता नव्यांना संधी देण्याची त्यांची हातोटी यामुळे भाजपामधीलप अंतर्गत कलह आता संपुष्टात येत असल्याचे दिसते. प्रथम पक्ष आणि नंतर व्यक्ती या नामदार गोरे यांच्या कार्यपध्दतीमुळे अनेक कार्यर्त्यांना न्याय मिळणार असल्याची चर्चा भाजपाच्या गोटात आहे.
——–
दोन्ही देशमुख गट बॅकफूटवर

आ. विजयकुमार देशमुख यांनी महापालिका निवडणूकीत काही ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केले तर काही ठिकाणी भाजपा विरोधी उमेदवारांना मदत केल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे आ. सुभाष देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा वगळता संपूर्ण निवडणूकीत कुठेच दिसले नाहीत. यामुळे दोन्ही आमदारव्दय देशमुखांवर पक्षश्रेष्ठ नाराज असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रत्येक गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना सांगून केल्याची कबुली देत भाजपामध्ये व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले. एवढे मोठे यश संपादन करुनही केवळ गटतट न पाहता देशमुख समर्थकांनाही मानाची पदे देवून ना. गोरे यांनी वैयक्तीक हेवेदावे नसल्याचे सिध्द केले.
——

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button