crimemaharashtrapoliticalsocialsolapur

मेल एक्सप्रेस व लोकल ट्रेनमध्ये चोरी करणाऱ्या आरोपीस अटक, लाखोचा मुद्देमाल जप्त

 

लोहमार्ग पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

वागळे : प्रतिनिधी

 

सध्या मेल एक्सप्रेस व लोकल ट्रेनमध्ये चोरीचे गुन्हे वाढले आहेत. हे चोरटे मेल एक्सप्रेस व लोकल गाडीच्या वेळी चढताना व उतरताना गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील चैन व खिशा मधील मोबाईल सिताफिने चोरत होते. या चोरीच्या गुन्ह्याला आळा बसावा म्हणून लोहमार्ग पोलीस आयुक्त राकेश कलासागर, मध्य परिमंडळ पोलीस उपायुक्त श्रीमती जेडगे, यांचे आदेशाने कल्याण विभाग सहायक पोलीस आयुक्त
नंदराज पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल वाणी, सहाय्यक पोलीस फौजदार ज्ञानेश्वर पाटील, लक्ष्मण कुटे, हेमकांत पाटील, समीर पठाण, अमीर तांबोळी, अंकुश धायगुडे, अमोल सूर्यवंशी यांनी उल्लेखनीय कामगिरी करत मेल एक्सप्रेस व लोकल रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची सोन्याची दागिने व मोबाईल फोन चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करून त्यांच्याकडून एका गुन्ह्यातील 20 ग्रॅम सोन्याची चैन व 18 मोबाईल फोन असा एकूण सात लाख पंधरा हजार चारशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

 

 

 

दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी कल्याण रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 6 ते कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम बाजूकडील रिक्षा स्थानक जवळ चालत येईपर्यंत दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने पर्समध्ये ठेवलेले पाकीटामधील एक सोन्याची चैन तिचे वजन अंदाजे २० ग्रॅम असतील सामानासह मुद्दाम लबाडीने गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले असले बाबत कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांनी गुन्ह्याचा तपास करून गुन्हे उघड करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांना सूचना दिल्या.

 

 

 

त्या अनुषंगाने गुन्हा प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तपास करणेबाबत मार्गदर्शन केले होते. सदरचा गुन्हा उघडकीस यावा म्हणून गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून व गर्दीच्या वेळी कल्याण रेल्वे स्थानक येथे सापळा रचून आरोपी दिलीप राम अवतार साहू व श्याम दिलीप साहू या गुन्हेगारांना सीता फिने ताब्यात घेतले आहे.

 

 

 

आरोपी यांची विचारपूस केली असता कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे केले असल्याची कबुली दिल्यावरून त्यांचे राहते घरून वीस ग्राम सोन्याची चैन, 18 मोबाईल फोन हस्तगत करुन दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून कल्याण रेल्वे पोलीस ठाणे हद्दीतील चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia