crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूर – पुणे हायवेवर पोलिस असल्याचे सांगून बतावणी करणाऱ्या आंतरराज्यीय गुन्हेगारास अटक फौजदार चावडी पोलिसांची कामगिरी….

फौजदार चावडी पोलीस ठाणे हददीत दिनांक २३/१२/२०२५ रोजी दुपारी पुणे सोलापुर हायवे लगत नागोबा मंदीर जवळ फिर्यादी यांना दोन मोटारसायकलवरील अनोळखी इसमांनी अडवुन त्यांना पोलीस असल्याची बतावणी करुन हातचलाखीने फिर्यादी यांची फसवणुक करुन त्यांचे हातातील सोन्याच्या दोन अंगठया व गळयातील सोन्याची चैन असे ३५ ग्रॅम दागीने चोरी करुन मोटारसायकलवरुन सदर इसम हे पळुन गेले अशी माहीती मिळाली होती. त्यानुसार तात्काळ फौजदार चावडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवुन तक्रार दार यांचे सांत्वन करुन त्यांची तक्रार दाखल करण्यात आली.. फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ९४६/२०२५ भा.न्या.सं. कलम २०४,३१८ (४),३१९ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

 

 

 

फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महादेव राउत व पोलीस निरीक्षक  तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षिरसागर व पथक यांनी तात्काळ या आरोपीतांचा शोध सुरु केला. तपासादरम्यान पथकाला अशी माहीती मिळाली की, सदर गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जाफर शहाजमान इराणी रा. लोणी काळभोर, पुणे याने केला असुन त्यास त्याचे गुन्हेगारी कृत्यामुळे पुणे येथुन सप्टेंबर २०२५ मध्ये ०२ वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. तो सध्या परळी वैजनाथ येथील इराणी वस्ती मध्ये राहत आहे. त्याअनुषंगाने तात्काळ सहाय्यक पोलिस निरीक्षक क्षिरसागर व डी. बी. पथकाने परळी वैजनाथ येथे जावुन संभाजी नगर पोलीस ठाण्याची मदत घेवुन पहाटेच्या सुमारास इराणी वस्ती मध्ये सदर आरोपीताचा शोध घेतला परंतु सदर आरोपीत हा तेथे मिळुन आला नाही. सदर आरोपीत जाफर हा तेथुनही पळुन गेला होता.

 

 

 

 

त्यानंतर देखील पोलीसांनी सतत त्याचा तपास सुरु ठेवला त्यादरम्यान त्याचा इतर जिल्हयातील पोलीस देखील सदर आरोपीत याचा शोध घेत असलेबाबत माहीती मिळाली. त्याअनुषंगाने सदर आरोपीत याचा शोध घेणे म्हणजे पोलीसांसाठी मोठे आवाहन होते. त्यातच महानगर पालीका निवडणुक आल्याने मोठया प्रमाणात बंदोबस्त देखील होता. त्यातुन सुदधा फौजदार चावडी पोलीसांनी सतत त्याचा तपास सुरु ठेवला. दिनांक २४/१/२०२६ रोजी तपासा दरम्यान डी. बी. पथकातील पोकॉ/विनोद पुजारी यांना माहीती मिळाली की, सदर आरोपीत हा पुन्हा इराणी वस्ती, परळी वैजनाथ येथे आला आहे. त्यावेळी त्तात्काळ फौजदार चावडी डी.बी. पथक परळी वैजनाथ येथे गेले परंतु त्यास पोलीस आल्याची माहीती मिळताच तो तेथुन पळुन पुण्याचे दिशेला गेला. सदर माहीती सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षिरसागर व डी.बी. पथकास मिळताच पोलीसांनी त्याचा पाठलाग सुरु केला. आरोपीत लोणी काळभोर, सुपा, मोरगाव, जेजुरी, सातारा, कोल्हापुर, सावंतवाडी अशा ठिकाणी अस्तीत्व लपवत फिरत होता.

 

व त्याचे मागे फौजदार चावडीचे सपोनिरी/क्षिरसागर व पथक हे देखील वेषांतर करीत त्याचा शोध घेत फिरत होते. पोलीसांनी त्याचा लगातार ०३ दिवस व रात्र शोध घेवुन तब्बल १२०० कीलो मीटर प्रवास करुन दिनांक २७/१/२०२६ रोजी आरोपीतास पहाटे सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग येथुन ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीत याचेकडुन सदर गुन्हयात चोरीस गेले ३५ ग्रॅम असे सोन्याचे दागीने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच जाफर इराणी याचा साथीदार याचे नाव निष्पन्न करण्यात आले असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास सुरु आहे.

त्याचप्रमाणे सदर आरोपीत याचा पुर्व गुन्हे अभिलेख पडताळला असता सदर आरोपीत

याच्यावर  अदयाप पर्यंत पोलीस बतावणी, फसवणुक, घरफोडी, जबरी चोरी, चैन स्नॅचींग असे १८ गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे सदर आरोपीत याने आणखीन खुप गुन्हे करुन तो फरार असल्याची शक्यता असुन त्याबाबत इतर जिल्हयांशी संपर्क करण्यात येत आहे.

अशाप्रकारे फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे डी. बी. पथकाने गुन्हा घडल्यापासुन दिवस रात्र आरोपीताचा शोध सुरु ठेवुन सातत्य पुर्ण तपास करुन आरोपीतांविरुदध कोणताही सुगावा नसताना सराईत आंतरराज्यीय आरोपीतास ताब्यात घेवुन उत्कृष्ट कामगीरी केली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो, श्री. एम. राजकुमार, मा. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ), श्री. विजय कबाडे, मा. सहा. पोलीस आयुक्त विभाग-१  प्रताप पोमण, व.पो.नि.  महादेव राउत, पोलीस निरीक्षक  तानाजी दराडे यांचे मागदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटिकरण पथकाचे पथक प्रमूख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, पोहवा/प्रविण चुंगे, पोहवा/सचिन बाबर, पोहवा/परिट, पोना/शिवानंद भिमदे, पोकॉ/विनोद पुजारी, पोकॉ/कृष्णा बडुरे, पोकॉ/विनोद व्हटकर, पोकॉ/अजय चव्हाण, पोकॉ/आतीश पाटील, पोकॉ/ज्ञानेश्वर गायकवाड, पोकॉ/शशीकांत दराडे, पोकॉ/अमोल खरटमल, पोकॉ/सुरज सोनवलकर, पोकॉ/ सुधाकर माने, पोकॉ/नितीन मोरे, पोकॉ/ पंकज घाडगे, पोहवा/अयाज बागलकोटे, पोहवा/प्रकाश गायकवाड, पोहवा/मच्छींद्र राठोड, पोकॉ/तौसीफ शेख यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button