BIG Breaking हॉटेल व बार या नावाखाली सत्ताधारी शिवसेना { शिंदे गटाचा} उपजिल्हा प्रमुखाच्या कुंटणखान्यावर पोलिसांची धाड राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण…

मुख्य संपादक -वैभव गंगणे
या प्रकरणात थोडक्यात हकीकत अशी की , स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस हेड कॉन्स्टेबल दीपाली सत्यवान जाधव या सोलापूर तालुका पोलिस ठाणे हद्दीत गुरुवार दिनांक २७/११/२०२५ रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांच्या समवेत पोलिस उप निरीक्षक गायकवाड पोलिस कॉन्स्टेबल बाळराजे घाडगे पोलिस कॉन्स्टेबल दोरकर असे शासकीय वाहनातून पेट्रोलिंग करत असताना तांदुळवाडी सोलापूर गावच्या हद्दीत सोलापूर – हैद्राबाद रोड लगत असलेल्या हॉटेल रिंकी बार व लॉज या ठिकाणी सागर धानप्पा सोलापूरे हा त्याच्या स्मार्टफोनवरून ग्राहकांना महिलांचे फोटो पाठवून वेश्याव्यवसायातून मुली पुरवत आहे.अशी खात्रीलायक बातमी सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांना मिळाल्यानंतर या बातमीची तत्काळ सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना कळविली .श्री जगताप यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांनी सापळा रचून सदर ठिकाणी धाड टाकली .
वायकर यांनी बनावट ग्राहकास सदर ठिकाणी पाठवून कारवाईच्या अनुषंगाने तयारी केली. व ग्राहकास हॉटेल रिंकी बार व लॉजवर पाठविले. पोलिसांनी पाठविलेल्या बनावट ग्राहकाने सागर धानप्पा सोलापूर यास संपर्क साधून वेश्या व्यवसायासाठीच्या महिला पाहून व्यवहार ठरवून पोलिसांना खिडकीतून हात बाहेर काढून इशारा केला.
इशारा करताच सहाय्यक पोलिस निरीक्षक वायकर पोलिस कॉन्स्टेबल दोरकर यांनी यांनी पंचसमक्ष रिंकी हॉटेल बार व लॉजवर धाड टाकली.त्यावेळी त्या ठिकाणी खुर्चीवर बसलेल्या इसमास त्याचे नाव व पत्ता विचारताच त्याने त्याचे नाव अभिजित उर्फ सागर धानप्पा सोलापूरे वय ३६ वर्षे राहणार तांदुळवाडी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर असल्याचे सांगत या हॉटेल चा मालक असल्याचे पोलिसांना सांगितले. व सोलापूरे यास पोलिसांनी पाठविलेला बनावट ग्राहक हा लॉज मधील रूम नंबर १ येथे एका महिलेसोबत असल्याचे दिसले.
सापळा रचल्या प्रमाणे पोलिसांनी बनावट ग्राहकास हा काय प्रकार आहे ? असे विचारले तेव्हा त्या ग्राहकाने हॉटेल चालक – मालक सागर सोलापूरे कडे बोट दाखवून याने शरीर संबंध साठी ही महिला दाखविली. ती मी पसंत केल्यानंतर या महिलेचा दर दीड हजार रुपये ठरला असून मी सागर याला १५०० हजार रुपये दिले आहे .यानंतर बातमीची खात्री झाल्यानंतर पोलिस उप निरीक्षक गायकवाड यांनी अभिजित उर्फ धानप्पा सोलापुरे यास अटक केली. सागर सोलापूरे याने बनावट ग्राहकाकडून घेतलेली रक्कम ,स्मार्ट फोन , व निरोधचे पाकीट जप्त केले .
तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक वायकर यांच्या आदेशान्वये संगीता मुक्तिराम जाधव वय वर्षे ५० भवानी चौक ,चौथा झेंडा गणेश नगर धाराशिव मूळ पत्ता भाग्य नगर मु. पो. अहमदपूर धाराशिव या महिलेची महिला पोलिसां मार्फत अंग झडती घेतली असता तिच्याकडे विवो कंपनीचा स्मार्ट फोन मिळून आला.
स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता ताब्यात घेण्यात आलेली महिला संगीता मुक्तिराम जाधव हिने बनावट ग्राहकासोबत असलेल्या महिले वेश्या म्हणून शरीर संबंधासाठी गिऱ्हाईकाना पुरवत असताना मिळून आल्या. हॉटेल चालक अभिजीत उर्फ सागर धानप्पा सोलापूरे हा त्याच्या लॉजमधील खोल्यांचा वापर कुंटण खाण्यासाठी करत आहे.त्यामुळे पंचासमक्ष स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुरू असलेला कुंटणखाना बंद पाडून हॉटेल चालक अभिजीत उर्फ सागर धानप्पा सोलापूरे व संगीता मुक्तिराम जाधव यांना ताब्यात घेतले.
व त्यांच्यावर सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार { प्रतिबंध } अधिनियम १९५६ प्रमाणे ३,४,५,६ नुसार तसेच भारतीय न्याय संहिता कलम १४४ {२} प्रमाणे गुन्हा दाखल केला .या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षण राहुल देशपांडे करीत आहेत.
या अटक करण्यात आलेला आरोपी अभिजित उर्फ सागर धानप्पा सोलापूरे हा सत्ताधारी शिवसेना उपजिल्हाप्रमुख व माजी उपसरपंच असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येतोय …..



