काटगावकर फसवणुक प्रकरण :- 11 स्थावर मालमत्ता लिलावाद्वारे विक्री करणेचे न्यायालयाचे आदेश:- विशेष सरकारी वकील अँड.संतोष न्हावकर…

सोलापूरः-
काटगावकर फसवणुक प्रकरणातील आरोपी शेखर काटगावकर याच्या एकूण 11 स्थावर मालमत्तेचे जाहीर लिलाव करुन लिलावातुन आलेली रक्कम जमा करावी असा आदेश
जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. योगेश राणे सो यांनी पारित केला आहे. त्यामुळे गुणवणूकदारांना त्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमा परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी स्थावर मालमत्ता विक्री करून रक्कम जमा करणेचा सोलापूर न्यायालयातील हा पहिलाच आदेश आहे.
मे.हरी ओम फायनान्स,
मे.रिध्दी सिध्दी फायनान्स, नवरत्न फायन्नास, कमर्शियल फायनान्स या फायनान्सव्दारे हजारो गुंतवणुकदाराकडुन जास्त व्याजाचे आमीष दाखवून ठेवी गोळा करुन ४५ कोटी पेक्षा जास्त रक्कमेची फसवणुक केल्या प्रकरणी भरलेल्या खटल्याची सुनावणी सोलापूर येथील मे. सत्र न्यायालयात सुरु आहे.
मुख्य आरोपी शेखर काटगावकर याने सोलापूर शहरात विविध ठिकाणी स्थावर मालमत्ता विकत घेतलेल्या होत्या.या सर्व मिळकती
गुंतवणुकदांरानी गुंतवलेल्या रक्कमेतून घेतलेल्या असल्याने गव्हर्नमेंट गॅझेट मध्ये प्रसिद्ध करून जप्त करणेत आलेल्या होत्या. त्या सर्व जागा जाहीर लिलावाव्दारे विक्री करुन ती रक्कम जमा करणेचा आदेश व्हावा असा अर्ज विशेष सरकारी वकिल अॅड. संतोष वि. न्हावकर यांनी न्यायालयात दाखल केलेला होता. त्यावर न्यायालयाने सर्व जागांचे मूल्यांकन करून त्याचा अहवाल सादर करणेचा आदेश पारित केलेला होता. आदेशाप्रमाणे सक्षम प्राधिकारी यांनी मूल्यांकन सादर केलेले होते.
सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना अँड. संतोष न्हावकर यांनी, हजारो गुंतवणुकदाराकडुन जास्त व्याजाचे आमिष दाखवून आरोपींनी रकमा गोळा केलेल्या आहेत व त्यातूनच स्थावर मिळकती घेतलेल्या असल्याने त्या मिळकती विक्री करून रकमा गुंतवणूकदारांना मिळणे गरजेचे असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले. सदरचा युक्तिवाद ग्राह्य़ मानून न्यायालयाने सरकार पक्षाचा अर्ज मंजूर करून एकूण मालमत्तेपैकी 11 मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करून रक्कम जमा करावी असा आदेश पारित केला.
यात सरकारपक्षा तर्फे विशेष सरकारी वकील अँड.संतोष न्हावकर तर आरोपी तर्फे अँड. शशी कुलकर्णी हे काम पहात आहेत.



