पर्यटन दर्शनासाठी प्रभाग ७ धरमसी लाईन मधील स्थानिक नागरिक रवाना…

सोलापूर
तीर्थक्षेत्र पर्यटन आणि दर्शन धरमसी लाईन येथील महीला माता भगिनी मोठ्या संख्येने काल रात्री तीर्थक्षेत्र पर्यटन दर्शन करीता रवाना झाल्या या तीर्थक्षेत्र पर्यटन वाहनांचे पुजन धरम सी लाईनचे मार्गदर्शक जेष्ठ नेते राजन भाऊ जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार उपस्थित होते..

या आपल्या चाळीतील सोसायटीतील आपल्या भागातील महीला माता भगिनी यांचे तीर्थक्षेत्र पर्यटन दर्शन करावे या उदात्त हेतूने चाळीतील सामाजिक कार्यकर्ते विशालजी कणसे यांनी धरम सी लाईनचे युवा नेते शंतनूदादा साळूंके यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे उत्तम असे आयोजन केले होते .
याप्रसंगी धरम सी लाईन येथील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तरूण कार्यकर्ते उपस्थित होते ..

या तीर्थक्षेत्र पर्यटन दर्शन उपक्रमात चाळीतील महीला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला …



