प्रभाग ७ साठी उद्योगपती गिरीष किवडे व त्यांच्या मातोश्री धानम्मा किवडे यांनी भाजपकडे दाखल केला इच्छुक उमेदवारी अर्ज….

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेत्रूत्वाखालील भाजपच्या विकासदृष्टीत्मक व प्रबळ कामकाजाने प्रेरित होऊन, देशाच्या या प्रगतीमध्ये आपला ही हातभार असावा या द्रुष्टीकोनातून, आज गिरीष मल्लिनाथ किवडे आणि त्यांच्या मातोश्री धानम्मा मल्लिनाथ किवडे यांनी प्रभाग क्र. ०७ येथून भारतीय जनता पक्षाच्या वतीने महानगरपालिका इच्छुक उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी,भाजपा सोलापूर कार्यलय मंत्री श्रीहरी म्याकल, डॉ.शिवराज सरतापे सरचिटणीस भाजपा सोलापूर, भाजपा सोलापूर चिटणीस मनोज कलशेट्टी, रवी भवानी भाजपा सदस्य, शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी सागरजी हिरेहब्बू, श्रीकांत घाडगे, सिद्धाराम कल्याणशेट्टी, गोपाल झंवर, अजित किवडे, वैष्णवी किवडे, मिलींद शिंगशेट्टी व आदी उपस्थित होते.

गिरीष किवडे हे २००९ पासून समाजकार्यामध्ये सक्रिय आसून, २०१० पासून ते श्री सरस्वती सेवक तरूण मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून कामकाज पाहतात. विशेषतः २००९ ला बाळीवेस शक्तीपूजा मंडळ मध्ये उपाध्यक्ष , २०११ ते २०१७ दादाश्री प्रतिष्ठानचे सदस्य आणि २०१७ साली दादाश्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष, व २०२२ साली जगदज्योती श्री महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळ सोलापूर चे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांचे नियोजनबद्ध आणि नावीन्यपूर्ण कल्पकतेतून केलेले उपक्रम त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाची छाप दिसून येते. तसेच भागातील राहणारे नागरिकांच्या समस्येचे पाठपुरावा करून निवारण करून द्यायचे काम कायम करत आले आहेत.
एक संयमी आणि दूरद्रूष्टीत्मक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना बघितले जाते. याच व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमामुळे २३ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांच्या मित्र आणि समर्थकांनी लोकवर्गणीतून त्यांचा वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळा करून त्यांना महानगरपालिका निवडणुकीत आपण थांबावेच असा हट्ट मांडला होता. लिंगायत समाजातून आज पर्यंत प्रभाग ७ मधून कधी दावेदारी मिळाली नाही, म्हणून किवडे यांना प्रबळ दावेदार म्हणून बघितले जात आहे.



