प्रभाग क्र. १३ साठी भारतीय जनता पार्टीकडे शिवरामचे सह-संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत वाडेकर यांनी इच्छुक उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या केला दाखल…

प्रभाग क्र. 13 साठी भारतीय जनता पार्टीकडे शिवरामचे सह-संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते शिवरामचे सह-संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत वाडेकर यांनी आज आपला इच्छुक उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या भा ज पा कार्यालयात सुपूर्द केला.
या वेळी नागेश सरगम मध्य मंडल अध्यक्ष, राहुल सत्यनारायण गंजी, पाटील सर, बाबुराव शिरसागर, श्रीनिवास पोतराज, नागेश म्हेत्रे, विजय अडसुळे, नरेश बंदाराम, दीपक बड्डू, अमर वाडेकर, गणेश दिवसांनी, बाबा वाडेकर, ऋषिकेश कवडदेवी, संभाजी शिंदे हे उपस्थित होते.
श्री. श्रीकांत वाडेकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्य करताना युवकांचे संघटन, सांस्कृतिक उपक्रम, सार्वजनिक प्रश्नांवर सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी घेतलेली धडपड यामुळे जनतेत विश्वास निर्माण केला आहे. शिवराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी ५००० पेक्षा अधिक युवकांना एकत्र आणत प्रभागातील विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घडवून आणला आहे.
चौकट – प्रभाग 13 ला आदर्श प्रभाग बनविणार
उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रभागातील विकासकामांना गती देणे, रस्ते–गटार–पाणी यासह सर्वांगीण उन्नतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची व प्रभाग 13 ला सोलापूरातील आदर्श प्रभाग बनविण्यासाठी कटीबद्ध राहीन अशी भूमिका श्रीकांत वाडेकर यांनी स्पष्ट केली.



