पर्यायी रस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात : ५४ मीटर रस्ता शुक्रवारी सकाळी ६ वाजता वाहतुकीसाठी खुले…

सोलापूर
सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज ५४ मीटर रस्त्याला भेट देऊन चालू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी संबंधित मक्तेदार व विभागीय अधिकाऱ्यांना निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.या प्रसंगी नगरा अभियंता सारिका अक्कलवार सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी तसेच संबंधित मक्तेदार व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते दमानी नगर रोडवरील रेल्वे ब्रिज पाडाकाम सुरू असल्याने नागरिकांच्या वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन महानगरपालिकेतर्फे ५४ मीटर रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून विकास करण्यात आला असून हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा रस्ता येत्या शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहे.
यावेळी आयुक्तांनी रस्त्याची गुणवत्ता, सुरक्षा उपाययोजना, लेव्हलिंग, साईड डेव्हलपमेंट इत्यादींची तपशीलवार पाहणी केली. तसेच कामात कोणतीही ढिलाई न सहन करण्याचे आदेश मक्तेदारांना देण्यात आले.
याचबरोबर रेल्वे गोदाम – नागोबा मंदिर मार्गावरील रस्त्याचे काम देखील वेगात सुरू असून, लवकरच हा मार्गही नागरिकांसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.आयुक्तांनी सांगितले की, प्रशासन नागरिकांच्या सुरक्षित आणि सुकर वाहतुकीसाठी सातत्याने प्रयत्नशील असून पर्यायी मार्ग वेळेत सुरू करण्यासाठी सर्व विभाग युद्धपातळीवर काम करत आहेत. या काळात नागरिकांनी सहकार्य करावे व वाहतूक नियमांचे पालन कराव असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. ओम्बासे यांनी नमूद केले की, “नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास अधिक सुरळीत आणि वेगाने पूर्ण होतील. शहराच्या प्रगतीसाठी प्रशासन आणि नागरिक यांचे एकत्रित सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.”



