काकासाहेब थोबडे प्रतिष्ठान तर्फे आयोजित वकिलांच्या भव्य क्रिकेट स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न…
मंगळवेढा वकील संघ विजेता तर करमाळा वकील संघ उपविजेता...

सोलापुर
काकासाहेब थोबडे प्रतिष्ठानने सोलापुर बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सोलापुर जिल्ह्यातील वकिलांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा शासकीय मैदान येथे मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडला
काकासाहेब थोबडे प्रतिष्ठानने सोलापूर बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने दि. १२/१२/२०२५ ते १४/१२/२०२५ दरम्यान आयोजित केलेल्या वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण २८ क्रिकेट संघ सहभागी झाले व अंतिम सामन्यात मंगळवेढा वकील संघाने करमाळा संघावर विजय मिळवुन काकासाहेब थोबडे चषक पटकावला..
स्पर्धेमध्ये मालिकावीर व बेस्ट बॉलर म्हणून करमाळा वकील संघाचे ॲड विश्वजीत बागल यांना तर बेस्ट बॅट्समन म्हणुन ॲड दीपक हुलसुरे यांना पुरस्काराने गौरवण्यात आले
प्रतिष्ठानने महिला वकील संघ व महिला कर्मचारी संघामध्ये देखील मैत्रीपूर्ण सामने भरवले होते व त्यामध्ये महिला वकील संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत विजय मिळवला व ॲड स्वाती बताले यांना मालिकावीर पुरस्कार देण्यात आला…
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास ॲड विश्वनाथ आळंगे, ॲड आर एम पटेल, ॲड उमेश मराठे, अॅड निलेश ठोकडे, अॅड लक्ष्मीकांत गवई, अॅड राजेंद्र फताटे, अॅड अशोक जालादी, अॅड ॲड सुभाष देशपांडे, अॅड शिरीष जगताप, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, अॅड महादेव गोटे, अॅड हजरत बडेखान, अॅड अजमोद्दीन शेख, अॅड मंगला जोशी चिंचोळकर, अॅड श्रीनिवास क्यातम, अॅड शर्मिला देशमुख, अॅड रईसा मदनी, अॅड नंदिनी किणीकर, ॲड बसवराज सलगर, ॲड मल्लिकार्जुन पाटील, अॅड आर एम मनुरे, अॅड संतोष होसमनी, अॅड रोहीदास पवार, अॅड भारत कट्टे, अॅड गंगाधर रामपुरे, ॲड एस व्ही उजळंबे, ॲड रेश्मे, ॲड बाबासाहेब जाधव ॲड सी एम सावंत, अॅड अरविंद देडे, अॅड बसवराज हिंगमिरे, अॅड मीरा प्रसाद यांच्यासह जिल्हयातून ५०० वकिलांची उपस्थिती होती…
स्पर्धेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड मिलिंद थोबडे यांनी व सचिव अॅड रितेश थोबडे यांनी विशेष परिश्रम घेतले….

छायाचित्रात डावीकडुन ॲड श्रीनिवास क्यातम, ॲड सुभाष देशपांडे, ॲड रितेश थोबडे, ॲड बाबासाहेब जाधव, ॲड राजू शेख, ॲड विश्वनाथ आळंगे, ॲड अशोक जालादी, ॲड लक्ष्मीकांत गवई, ॲड मिलिंद थोबडे, ॲड भारत कट्टे, ॲड राजेंद्र फताटे, ॲड सी एम सावंत, ॲड एस व्ही उजळंबे, ॲड डी सी जाधव, अॅड धनंजय हजारे दिसत आहेत



