काकासाहेब थोबडे प्रतिष्ठान तर्फे आयोजित वकिलांच्या भव्य क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन संपन्न

सोलापुर
काकासाहेब थोबडे प्रतिष्ठानने सोलापुर बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सोलापुर जिल्ह्यातील वकिलांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा उदघाटन सोहळा वेदा बॅंक्वेट्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला
कार्यक्रमप्रसंगी काकासाहेब थोबडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड मिलिंद थोबडे यांनी प्रतिष्ठान स्थापनेची उद्दिष्टे सांगुन प्रतिष्ठानमार्फत राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहीती दिली..
कार्यक्रमाचे उदघाटक मुंबई उच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ विनीत नाईक यांनी उद्घाटनपर भाषणामध्ये प्रतिष्ठानचे कार्याचे कौतुक करून कै. काकासाहेब थोबडे यांच्या आठवणींना उजाळा दिला
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड जयंत जायभावे यांनी बार कौन्सिल महाराष्ट्र व गोवाच्या माध्यमाने ॲड मिलिंद थोबडे यांच्या कल्पनेतून गेल्या पंधरा वर्षापासून वकिलांसाठी विविध कल्याणकारी योजना कशा आमलात आणल्या गेल्या आहेत याची माहिती देऊन वकिलांच्या दैनंदिन जीवनातील ताण कमी करण्यासाठी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेबाबत प्रतिष्ठानचे कौतुक केले…
कार्यक्रमात सोलापुर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड बाबासाहेब जाधव यांनी प्रतिष्ठानच्या स्तुत्य उपक्रमास सोलापुर बार असोसिएशनने पाठींबा दिल्याचे सांगितले व प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले
सदर स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातून एकुण ३० क्रिकेट संघाचा व त्यामध्ये २ महिला क्रिकेट संघानी सहभाग घेतला आहे
कार्यक्रमात खेळाडूंसाठी देण्यात येणाऱ्या टी शर्ट व पारितोषकांचे अनावरण करण्यात आले….
कार्यक्रमास सोलापुर बार असोसिएशनचे ॲड रियाज शेख, ॲड बसवराज हिंगमिरे, अॅड अरविंद देडे, ॲड मीरा प्रसाद यांच्यासह ५०० वकिलांची उपस्थिती होती
कार्यक्रमात आभारप्रदर्शन प्रतिष्ठानचे सचिव ॲड रितेश थोबडे यांनी केले तर सूत्रसंचालन ॲड शरद पाटील व ॲड मनोज पामूल यांनी केले



